‘त्या’ विधानावरून फडणवीसांनी केला राऊतांवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदींनी लहानपणी चहा विकून स्वत:चं शिक्षण पूर्ण केलं. मग त्यांनी घेतलेली पदवी लपवण्याचं काय कारण? असा प्रश्न देशाला भेडसावत आहे. तसेच, पंतप्रधानांनी पदवी मागणाऱ्या केजरीवालांना २५ हजार रुपयांचा दंड लावतात, हा कुठला न्याय आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः याचा खुलासा का करत नाही. खरे तर स्वत: प्रसारमाध्यमांसमोर येऊन खुलासा केला पाहिजे.असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

‘त्या’ विधानावरून फडणवीसांनी केला राऊतांवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संभाजीनगर परिसरात घेतलेल्या वज्रमूठ सभेला अलोट गर्दी जमा झाली होती. खूप जनसमुदाय जमा झाला होता.उद्धव ठाकरे भाषणासाठी उभे राहिल्या नंतर त्यांना अलोट गर्दीने चांगला प्रतिसाद दिला. या सभेत उद्धव ठाकरे यांनीं अनेक विषयांचा उल्लेख केला मात्र त्यातील एक मुद्दा म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा विषय भर सभेत मांडला. आणि हा मुद्दा महाविकास आघाडी कडून चांगलाच उचलून धरला. झालेल्या सभेनंतर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील मोदींना ट्विटच्या माध्यमातून टार्गेट केलं आहे.शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान मोदींनी लहानपणी चहा विकून स्वत:चं शिक्षण पूर्ण केलं. मग त्यांनी घेतलेली पदवी लपवण्याचं काय कारण? असा प्रश्न देशाला भेडसावत आहे. तसेच, पंतप्रधानांनी पदवी मागणाऱ्या केजरीवालांना २५ हजार रुपयांचा दंड लावतात, हा कुठला न्याय आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः याचा खुलासा का करत नाही. खरे तर स्वत: प्रसारमाध्यमांसमोर येऊन खुलासा केला पाहिजे.असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. “प्लॅटफॉर्मवर चहा विकून मोदींनी शिक्षण पूर्ण केलं. बीए, एम.एम विथ इंटायर पॉलिटिकल सायन्स… ऐतिहासिक आणि क्रांतिकारी विषयात त्यांनी पदवी घेतली आहे. ही त्यांची पदवी संसदेला समजली पाहिजे. मोदींनी नवी संसद बनवली, तिथे पदवी लावण्यात यावी. त्यात लपवण्यासारखं काय आहे,” असा सवालही संजय राऊतांनी विचारला आहे.नव्या संसद भवनाच्या मुख्यद्वारावर ही पदवी लावली पाहिजे. भाजपाच्या बहुतांश नेत्यांची पदवी बोगस आहे. दहा लोकांची नावं घ्या, त्यातील बहुतांश नेत्यांची पदवी बोगस असेल.” असाही संजय राऊत म्हणाले.

त्यामुळे आता या संबंध प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. “अलीकडच्या काळात बाजारबुणगेही पंतप्रधान मोदींवर बोलतात. त्या बाजारबुगण्यांना सांगू इच्छितो, सुर्याकडे पाहून थुंकाल, तर थुंकी तुमच्या तोंडावर पडणार आहे. सूर्यावर पडू शकत नाही.”“त्यामुळे हे राऊत, फाऊद, दाऊद जे असतील यांना सांगतो, मोदींकडे तोंड करून थुंकण्याचा प्रयत्न करू नका. तुमची थुंकी तुमच्याच तोंडावर पडत आहे. त्याच थुंकीने लथपथलेला चेहरा पाहण्याची कोणाची इच्छा नाही,” अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर केली आहे. संजय राऊतांच्या विधानानंतर त्यांच्यावर राजकीय स्तरातून टीकास्र होताना दिसत आहे.

हे ही वाचा : 

एलॉन मस्क यांनी बदलला Twitter चा आयकॉनिक LOGO

Mahavir Jayanti 2023, घरच्या घरी बनवा चविष्ट जैन व्हेज पफ

जितेंद्र आव्हाड यांनी दिले बागेश्वर बाबांना खुले चॅलेंज

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version