Friday, June 28, 2024

Latest Posts

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : PUNE HIT-AND-RUN या प्रकरणी विधानसभेत फडणवीसांचे भाष्य..

देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी कशाप्रकारे या प्रकरणाच्या मुळाचा शोध घेतला यासंदर्भात माहिती सांगितली. “अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना घेतला होता.

सध्या चांगलेच गाजलेले प्रकरण म्हणजे पुणे पोर्शे कार हिट अँड रन (PUNE HIT-AND-RUN) हे प्रकरण. ड्रिंक अँड ड्राइव्ह (Drink And Drive) नंतर मोठयाप्रमाणावर गाजलेलं पुणे पोर्शे कार प्रकरण. यात एका अल्पवयीन मुलाने दोन तरुण मुलांना भरधाव वेगाने पोर्शे (Porsche car) कारने उडवण्यात आले व त्यांनतर तो मुलगा तिथून निघून गेला. त्यावेळी तेथील लोकांनी त्याला अडवून धरले व त्याला कैद झाली. त्यांनतर तो दोषी आहे हा पुरावा त्याच्या आईने बदलून तपासाची दिशा बदलवण्याच्या प्रयत्नांमुळे त्यांनाही कैद करण्यात आले. त्या अल्पवयीन मुलासह अजून १० जणांना पकडण्यात पोलिसांना यश आलं होत. त्यांनतर त्या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात धाडण्यात आले. काही दिवसांनी त्याला पश्चात्ताप झाला आहे असे सांगून जामिनावर त्याची सुटकाही करण्यात आली. याच प्रकरणी आज म्हणजे २८ जून रोजी झालेल्या विधानसभा परिषदेत उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले. 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलिसांनी कशाप्रकारे या प्रकरणाच्या मुळाचा शोध घेतला यासंदर्भात माहिती सांगितली. “अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना घेतला होता. ज्यावेळी रक्ताच्या नमुन्यात अल्कोहल नाही, लक्षात आलं, त्यावेळी पोलिसांना स्ट्राइक झालं, की, काहीतरी गडबड आहे. पोलिसांनी तात्काळ त्याचा डीएनए घेतला. रक्ताचा नुमना त्या डीएनएशी मॅच केला. वडिलांचा डीएनए घेतला तो मॅच केला. आरोपीचा डीएनए (DNA) रक्ताच्या नमुन्याशी मॅच होत नव्हता. पोलिसांनाी तात्काळ कारवाई केली. डॉक्टरांना अटक केली. डॉक्टरने ३ लाख रुपये घेऊन रक्ताचे नमुने बदलल्याच मान्य केलं. या सर्व बाबी रेकॉर्डवर आल्या पाहिजेत. आरोपपत्र दाखल केलं. अपघाताच्यावेळी गाडीत लॉक झालेला स्पीड ११० किमी आहे” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “घरापासून सीसीटीव्ही फुटेज जप्त केलं. पहिला ज्या बारमध्ये गेला, तिथलं सीसीटीव्ही फुटेज, फूड बील जप्त केलय. दुसऱ्याबारमध्ये गेला तिथलं सीसीटीव्ही फुटेज आहे. आता लीगल आणि टेक्निकल पुराव्यांची कमतरता नाहीय” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

वडील व आजोबा यांच्यावर किडनॅपिंगचा आरोप :

“आपला मुलगा प्रौढ नाहीय हे माहित असूनही वडिलांनी त्याला गाडी चालवायला दिली. म्हणून ज्युवेनाईल जस्टिस कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ज्या मॅनेजर्सनी त्यांना दारु दिली, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय. आरोपीच्या आजोबांनी ड्रायव्हरला गुन्हा अंगावर घ्यायला सांगितला. तो पोलिसांकडे गेला, मी गाडी चालवत होता म्हणून सांगितलं. पण पोलिसांनी मान्य केलं नाही. आजोबांनी ड्रायव्हरला कोंडून ठेवलं. पण त्याने गुन्हा मान्य केला नाही. वडिल आणि आजोबांवर किडनॅपिंगची केस लावली आहे” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या विधानसभा परिषदेत सांगितले.

त्याच सोबत त्यांनी अल्पवयिन मुलाच्या फॉरेन्सिक रिपोर्ट (Forensic Report) कडेही लक्ष वळवले .

यासंदर्भात सांगताना ते म्हणाले की- “आरोपीला ३ वाजता आणलं, त्याला लगेच मेडीकलला पाठवायला पाहिजे होतं. पण साडेआठला पाठवलं. वरिष्ठांना तात्काळ कळवायला पाहिजे होतं. पण ते कळवलं नाही. याचा सगळा रेकॉर्ड केस डायरीमध्ये आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्याने ड्युटी नीट केली नाही त्याला निलंबित केलय. ज्या पब्सनी अटी, शर्तींच उल्लंघन केलं, अशा ७० पब्सवर कारवाई केलीय लीगल एव्हिडन्स मध्ये कोणतीही कमतरता नाही “

एकंदरीत स्थित सरकारने या प्रकरणी कोण कोणती कामे केली या संदर्भात त्यांनी आजच्या विधानसभेमध्ये माहिती दिली. 

Latest Posts

Don't Miss