व्होट जिहाद शब्द वापरून फडणवीसांनी संविधानाचा अवमान केला, सचिन सावंत यांनी सुनावले खडे बोल

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संविधानिक पदावर बसले आहेत. फडणवीसांनी व्होट जिहाद हा शब्द वापरणे म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने जो मतांचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिला आहे

व्होट जिहाद शब्द वापरून फडणवीसांनी संविधानाचा अवमान केला, सचिन सावंत यांनी सुनावले खडे बोल

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संविधानिक पदावर बसले आहेत. फडणवीसांनी व्होट जिहाद हा शब्द वापरणे म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने जो मतांचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिला आहे त्याचा अवमान फडणवीस यांनी केला आहे. संविधाना आधारे घेतलेल्या शपथेचा भंग आहे. त्याचबरोबर देशात गेल्या दहा वर्षांपासून “संघ जिहाद” प्रकल्प राबविला जात असून आता फडणवीसांचा राज्यात खुर्ची जिहाद सुरु असल्याची खरमरीत टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

सचिन सावंत म्हणाले, प्रथमतः मुस्लिम समाज भाजपाला मतदान का करत नाही? याचा विचार फडणवीसांनी व भाजपा नेत्यांनी केला पाहिजे. भाजपाच्या पक्षघटनेत सर्वधर्मसमभाव आणि गांधीवादाचा मार्ग आहे याचा विसर भाजपाला पडला आहे हे याचे मूळ कारण आहे. जम्मू काश्मीरमध्ये मुस्लिम सणांना दोन सिलिंडर मोफत देणारी महाराष्ट्रात भाजपा नितेश राणे आणि रामगिरी महाराजांच्या पाठिशी उभी राहते. मुसलमानांना जाणिवपूर्वक लक्ष्य केले जाते. तुम्हाला मुस्लिम मते मिळावीत असे वाटत असेल तर जो जो द्वेष पसरतो त्याला संरक्षण देऊ नका. धार्मिक भेदभावाला चालना देऊ नका. केवळ दिखाव्यासाठी संविधानाची मंदिरे उभारुन चालत नाही, संविधानाला नागरिक व नेता म्हणून आपल्या जीवनाचा भाग करावा लागतो. यावेळी सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या मंत्रीपदाच्या शपथेतील महत्वाचा भाग आठवणीसाठी सांगितला. सचिन सावंत म्हणाले, “कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रध्दा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन………आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन.” याची उजळणी फडणवीसांनी करावी.

सचिन सावंत म्हणाले कि, देशात संघाचा प्रसार करण्यासाठी भाजपा आणि संघाकडून “संघ जिहाद” हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत गेली दहा वर्षे “व्होट जिहाद” “लव जिहाद”” लँड जिहाद” सारखे शब्द भाजपा आणि संघाकडून वापरले जातात. खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्यासाठी अशा शब्दांचा प्रयोग केला जातो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी”व्होट जिहाद ” हा शब्द वापरला आणि आता “लव जिहाद ” ! लोकसभा निवडणुकीत महायुतीचे महाराष्ट्रात पानिपत झाल्याने यांची खुर्ची संकटात सापडली आहे. म्हणूनच आता त्यांचा “खुर्ची जिहाद” सुरू झाला आहे. या प्रकल्पाअंतर्गत आता नितेश राणे, रामगिरी महाराज व महायुतीचे नेते द्वेष पूर्ण वक्तव्य देत आहेत. काँग्रेस पक्ष यावेळीही देशात द्वेष पसरविण्याचा हा प्रकल्प हाणून पाडेल, असा विश्वास देखील सचिन सावंत यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे गटाने विरोधकांना डिवचलं, बाप को हात लगानेसे पहले…

‘मुंबईत हायअलर्ट’? दहशतवादी मोठ्या हल्ल्याची भीती, पोलीस ऍक्शन मोडवर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version