चुकीच्या पद्धतीने घटनाक्रम जोडू नये, नाशकातील राजकीय ट्विस्टबद्दल फडणवीसांचं स्पष्टीकरण

आम्ही कोणतंही गणित घडवलेले नाही. मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो, पण सगळेच नेते तिथं होते. राजकीय कार्यक्रमांना नेत्यांनी एकत्र येणं होतच असत. त्यामुले हा घटनाक्रम चुकीच्या पद्धतीने जोडू नये. जे काही असेल ते योग्यवेळी सगळं समोर येईल," असं सप्ष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिल.

चुकीच्या पद्धतीने घटनाक्रम जोडू नये, नाशकातील राजकीय ट्विस्टबद्दल फडणवीसांचं स्पष्टीकरण

राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल नाशिकमध्ये अर्ज भरण्याच्या वेळी काँग्रेसचे सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही, तर त्यांचा मुलगा आणि काँग्रेसचे युवा प्रदेशअध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आलं आहे. तसेच एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सत्यजित तांबे यांच्यावर डोळा असल्याचं म्हटलं होत. त्यांनतर या सगळ्यामध्ये भाजपची काही राजकीय खेळी आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण त्यासर्व प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत पूर्ण विराम दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातून माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले देवेंद्र फडणवीस म्हणाले,‘आम्ही कोणतंही गणित घडवलेले नाही. मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो, पण सगळेच नेते तिथं होते. राजकीय कार्यक्रमांना नेत्यांनी एकत्र येणं होतच असत. त्यामुले हा घटनाक्रम चुकीच्या पद्धतीने जोडू नये. जे काही असेल ते योग्यवेळी सगळं समोर येईल,” असं सप्ष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिल.

त्यानंतर भाजपने अजून नाशिकमधून कोणताही उमेदवार दिला नाही, यावरही त्यांनी उत्तर दिल. यावेळी ते म्हणाले,”आमची कोणता उमेदवार द्यायची यावर चर्चा सुरू होती. राजेंद्र विखेंनी उमेदवारी द्यावी, अशी चर्चा होती पण ऐनवेळी उमेदवारी द्यायचं नाही असं ठरलं” असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

काही दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब थोरात यांना सत्यजित तांबेना अजून किती लांब ठेवणार? चांगल्या माणसांवर आमचा डोळा आहे,” असं म्हटलं होत. त्यातच सत्यजित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि भाजपकडे पाठिंब्याची मागणी करणार असल्याचं म्हटलं होत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सत्यजित यांच्या भूमिकेला भाजपचा छुपा पाठिंबा असल्याचं म्हटलं जात होत. पण त्यावर आज देवेंद्र फडणवीस यांनी या उत्तरावर स्पष्टीकरण दिल आहे. मात्र त्यांनी योग्य वेळी सगळं समोर येईल असं देखील म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात कोणता नवीन ट्विस्ट येतो हे पाहणं महत्वाचं आहे.

हे ही वाचा:

IND vs NZ भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर, ‘या’ गोलंदाजाला मिळणार कर्णधारपद

आता राजमाता जिजामाता यांची यशोगाथा दिसणार मोठ्या पडद्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version