ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याच्या मुद्दावर फडणवीसांचं स्पष्टीकरण

अंधेरी पोटनिवडणूक ही आता वेगळ्याच अर्थाने चर्चेत येण्याची जास्त शक्यता दिसून येत आहे. या निवडणुकीमध्ये अनेक ट्विस्ट येताना दिसत आहेत. आता शिवसेनेच्या अडचणी वाढतंच चालल्या आहेत.

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याच्या मुद्दावर फडणवीसांचं स्पष्टीकरण

अंधेरी पोटनिवडणूक ही आता वेगळ्याच अर्थाने चर्चेत येण्याची जास्त शक्यता दिसून येत आहे. या निवडणुकीमध्ये अनेक ट्विस्ट येताना दिसत आहेत. आता शिवसेनेच्या अडचणी वाढतंच चालल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा स्वीकारण्यास विलंब होत असल्यामुळे ठाकरे गट कोर्टात धाव घेणार आहे. तर महापालिका अधिकाऱ्यांवर शिंदे गटाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

फडणवीस म्हणाले की नियम सर्वांसाठी सारखे आहे. कोणताही दबाव आणला जात नाही. आमचा कोणावरही दबाव नाही. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहोत. कोण उमेदवार द्यायचा याचा निर्णय चर्चेतून घेतला जाणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं. दरम्यान महापालिका पूर्णपणे स्वयत्ता आहे. राजीनामा घेण्याबाबत त्यांचे निर्णय आहे. सरकार काहीही हस्तक्षेप करत नाही. त्यात आमचा हस्तक्षेप नाही. आमच्याकडून ही कोण निवडणूक लढणार याची घोषणा आम्ही लवकरच करू, असंही फडणवीस यांनी म्हटलं.

यासर्व प्रकरणी शिवसेनेचे नेते अनिल परब यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “ऋतुजा लटके यांचा राजीनामा अजूनही स्वीकारला जात नाही. त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय वॉर्ड ऑफिसरपर्यंत सुटायला हवा होता. या विषयात महापालिका आयुक्तांचा तसा काही संबंध येत नाही. पण प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचं दिसून येतंय. ऋतुजा लटके या जर शिंदे गटात असत्या तर याचं चित्र वेगळं असतं.”

तर या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी आज महापालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यावर प्रतिक्रिया देताना महापालिका आयुक्तांनी माहिती दिली आहे की , ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर नेमका काय निर्णय घ्यायचा याची प्रक्रिया सुरू असून येत्या ३० दिवसांमध्ये या राजीनाम्यावर निर्णय होईल असं महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं.

हे ही वाचा :

३० दिवसांमध्ये या राजीनाम्यावर निर्णय होईल; ऋतुजा लटके यांच्या अर्जावर आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचं वक्तव्य

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाचे दावेदार मुरजी पटेल यांची माघार?

मी मशाल चिन्हावरच निवडणूक लढवणार; ऋतूजा लटके यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version