spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

क्रेनमध्ये बिघाड हे नेते पडतापडता वाचले; जाणूयात सविस्तर

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे अतिशय वेगाने वाहत आहेत. प्रत्येक पक्ष आपली पोळी भाजून घेण्यास उत्सुक आहे. प्रत्येक पक्ष हा स्वतःच्या बाजून उत्तरोत्तर प्रयत्न करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांचे दौरे हे वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत. या दौऱ्यांमधून स्वपक्षाचा विस्तार आणि स्वपक्षाच्या ज्या जागा आहेत त्या जिंकून याव्यात म्हणून हे दौरे केले जात आहेत. त्याचबरोबर पक्षबांधणीसाठी अनेक नवनवीन योजना आखल्या जात आहेत.आज राज्यात पुन्हा रयतेचे राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे. ही यात्रा आज (शुक्रवारी) शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झाली आहे. यात्रेत महायुतीचे काळे कारनामे जनतेपुढे उघड केले जातील, असा इशारा त्यांनी दिला. मात्र शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते थोडक्यात बचावल्याची घटना घडली आहे.

नेमके काय घडल त्या वेळी ?

शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून खाली येत असताना क्रेनमध्ये बिघाड झाला. जयंत पाटील आणि अमोल कोल्हे क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले. शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. क्रेनच्या सहाय्याने पुतळ्याला पुष्पहार घालून खाली येत असताना क्रेनच्या ट्रॉलीमध्ये बिघाड झाला. यामुळे जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख थोडक्यात बचावलेत, सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नसून सर्व जण थोडक्यात बचावले आहेत. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

पुष्पहार घालून खाली उतरताना अर्ध्यावर पोहचल्यावर क्रेन तुटली. जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख खाली पडण्याची शक्यता होती. सुदैवाने, कुणालाही दुखापत झाली नाही पण यात्रेच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.

पहिल्या टप्प्यासाठी ही यात्रा कशी असेल ?

पहिल्या टप्प्यात दहा दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतून फिरणार आहे. त्यानंतर लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाईल. ९ ऑगस्ट हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे, या दिवशीच महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ‘चले जाओ’ चळवळीचा नारा ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला होता. तसेच जागतिक आदिवासी दिवस असल्याने ९  ऑगस्टची निवड केल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

हे ही वाचा :

Vidhansabha Election 2024 : ‘या’ ७ विभागात होणार जाहीर सभा; मुख्यमंत्र्यांसह ३ नेत्यांनी घेतला मध्यरात्री निर्णय

Paris Olympics 2024 : भारताच्या खात्यात ‘रौप्य’ पदकाचा मान; Niraj Chopara याने तोडला आपलाच ऑलम्पिक रेकॉर्ड ठरला इतिहाससच मानकरी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss