शेतकऱ्यांकडं ना झाडी, ना हॉटेल, ना ५० खोके; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

शेतकऱ्यांकडं ना झाडी, ना हॉटेल, ना ५० खोके; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. यावर भाष्यकरत सुप्रिया सुळे यांनी सांगितले गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकासन झालं आहे. त्यामुळं सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे शेतकऱ्यांकडं ना झाडी, ना हॉटेल, ना ५० खोके असे म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारवला टोला लगावाला आहे . तसेच केंद्र आणि राज्य सरकारला सर्व सामन्यांचे घेणं देणं नाही. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर कुणीही जात नाही असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सुप्रिया सुळे या पुरंदरच्या दौऱ्यावर आहेत. पुरंदर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्या पावसामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पांगारे गावात सुप्रिया सुळेंनी शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली.यावेळी त्या म्हणाल्या “शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. राऊतवाडी या ठिकाणी हरणी ते मुरती या रस्त्याचे भूमिपूजन देखील सुळेंनी केलं. सध्या ज्या पद्धतीनं राज्यात राजकारण सुरु आहे, त्यानुसार लोकसभेआधीच विधानसभा निवडणूक लागेल अस वाटतं आहे.”

तसेच सरकारचे दिवाळी गिफ्ट पोहोचले नाही. कारण त्यांना पाहिजे असणारे फोटो त्यावर लागले पाहिजेत. एक वेळ माणूस उपाशी राहिला तरी चालेल पण फोटो लागला पाहिजे, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केला. केंद्र आणि राज्य सरकारला सर्व सामन्यांचं घेणं-देणं नाही. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर कुणीही जात नसल्याचे सुळे यावेळी म्हणाल्या. आमच्या शेतकऱ्यांकडे ना झाडी आहेत ना हॉटेल ना ५० खोके असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला. ही दिवाळी आपल्यासाठी गोड नाही. एवढा पाऊस झाला की, आपली दिवाळी गोड झाली नाही. सरकारला विनंती आहे तुम्ही सगळं बाजूला ठेवा, ओला दुष्काळ आणि सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीय.

Exit mobile version