आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवलं – उद्धव ठाकरे

Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha Live : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा नागपूरमध्ये पार पडत आहे. या वज्रमूठ सभेसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते नागपूरमध्ये आले आहेत.

आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवलं – उद्धव ठाकरे

Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha Live : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा नागपूरमध्ये पार पडत आहे. या वज्रमूठ सभेसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते नागपूरमध्ये आले आहेत. नागपूरमधील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सुनील केदार, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार आदी नेते उपस्थित आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या सभेतील ठळक मुद्दे

‘जगात देशाचा क्रम घसरतोय, पण सत्ताधाऱ्यांच्या मित्राचा क्रमांक वाढतोय’ असं म्हणतं उद्धव ठाकरेंनी केंद्रातील भाजप सरकारला टोला लगावला, हे जर खरे रामभक्त असते तर सुरत, गुवाहाटी गेले नसते अयोध्येला गेले असते? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांनी नुसता वन वन फिरला म्हणजे काम होत नाही म्हणून सडकून टीका केली आहे. सोबतच देवेंद्र फडणवीस कधी आयोध्याला गेले नाहीत, पण सीएम गेले म्हणून फडणवीसही गेले म्हणतं आयोध्या दौऱ्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीबद्दल टीका केली आहे.

अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, ही आनंदाची गोष्ट असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सच्च्या समाजसेवका समोर झुकावं लागतं. आप्पासाहेब यांचं घराणं मोठं असून या घराण्याची मोठी परंपरा आहे. धर्माधिकारी घराणं व्यसनमुक्तीचं काम करतात. दारुचं व्यसन घर उद्ध्वस्त करतं पण सत्तेची नशा देश उद्ध्वस्त करते असं उद्धव ठाकरे यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबत कौतुक करत सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदींनी आठ वर्षात काय केलं ते जनतेसमोर येऊन सांगत का नाही? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मंदीच्या काम काजाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ज्या पद्धतीने शिवसेनेचं नाव चोरलं, माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करताय, मग तुम्ही जनतेला कसं सांभाळणार असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र टांगल आहे.

Exit mobile version