पन्नास खोके, चिडलेत बोके… विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला

शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. आज शेवटचा दिवस असून अधिवेशनाची सांगता होणार आहे. काल अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धक्काबुकी झाली होती आणि वाद देखील झाली.

पन्नास खोके, चिडलेत बोके… विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला

शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. आज शेवटचा दिवस असून अधिवेशनाची सांगता होणार आहे. काल अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धक्काबुकी झाली होती आणि वाद देखील झाली. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून आज देखील देखील सत्ताधारी पक्षाने आदित्य ठाकरे आणि विरोधकांवर घोषणाबाजी केली. तर त्यांना प्रतिउत्तर देत विरोधकांनी म्हणजेच महाविकास आघाडीने देखील गोर्डर घोषणाबाजी केली आहे.


आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar)
आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पन्नास खोके चिडलेत बोके… ओला दुष्काळ जाहीर करा… नाहीतर खुर्च्या खाली करा… महाराष्ट्र के गद्दारों को जुते मारो सालों को… गुंडगिरी दडपशाहीने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या सरकारचा धिक्कार असो…ईडी सरकार हाय हाय… पैसा आमच्या जनतेचा… नाही कुणाच्या बापाचा… शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध असो… गद्दार सरकारचा निषेध असो… सातवा वेतन न देणार्‍या सरकारचा धिक्कार असो… एसटी कर्मचाऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…बलात्कारांचा सत्कार करणार्‍या सरकारचा धिक्कार असो…अशा गगनभेदी घोषणा देत आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात विधानभवन परिसर दणाणून सोडला.

हे ही वाचा :-

.. त्यांच्यावर झालेले संस्कार आज त्यांनी दाखवले, आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य

स्वाइन फ्लू: अचानक फ्लूच्या घटनांमागील कारणे काय आहेत आणि ते कसे टाळता येईल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version