Thackeray vs Shinde : ठाण्यातील किसन नगर येथे, शिंदे गट आणि ठाकरे गटात हाणामारी

Thackeray vs Shinde : ठाण्यातील किसन नगर येथे, शिंदे गट आणि ठाकरे गटात हाणामारी

काल रात्री (१४ नोव्हेंबर) ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली. किसन नगरमध्ये ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. संबंधित प्रकार कॅमेऱ्यातही कैद झालाय. विशेष म्हणजे या मारहाणीवेळी खासदार राजन विचारे हे देखील तिथेच उपस्थित होते. किसन नगरमध्ये ठाकरे गटाकडून मेळावा घेण्यात येत होता. यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते योगेश जानकर यांच्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

हेही वाचा : गरोदर पणात कोणता आहार घ्यावा, जाणून घ्या…

या संपुर्ण प्रकरणानंतर स्थानिक पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद केली जात आहे. या हाणामारीत दोन जणांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र ही हाणामारी नेमक्या कोणत्या वादातून झाली. तसेच अचानक शिंदे गटाचे कार्यकर्ते याठिकाणी कशामुळे आले, याचा पोलीस तपास करणार आहे.

सकाळी उठून फक्त या गोष्टी करा ब्लड शुगर राहील नियंत्रणात…

माहितीनुसार, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे शाखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले होते. त्यांच्यासोबत किसन नगरमधील ठाकरे गटाच्या इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील राजकीय संघर्ष वारंवार वाढल्याचं दिसून येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या विकृतीकरणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मनसेनं त्याला विरोध केला. मात्र, नंतर जितेंद्र आव्हाड यांना अटक कण्यात आली. आज ठाण्यात किसननगर भागात शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्याचं दिसून आलं.

Exit mobile version