spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अभ्यास करून ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमा तयार केला, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

गोव्यात सुरू असलेल्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’चे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमावर भाष्य केलं. इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला असभ्य आणि प्रचारकी चित्रपट असं म्हटलं.

गोव्यात सुरू असलेल्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’चे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमावर भाष्य केलं. इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला असभ्य आणि प्रचारकी चित्रपट असं म्हटलं. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) सिनेमात वास्तव दाखवलं गेलंय. काश्मिरी पंडितांवरील अन्यायावर या सिनेमातून भाषिय करण्यात आलंय. या सिनेमासाठी रिसर्च केला गेला आहे. अभ्यास करून ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमा तयार केला गेलाय, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमावरून सध्या जोरदार दावेप्रतिदावे सुरु आहेत. काश्मीरी पंडितांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या या सिनेमावरून मविआ आणि युतीच्या नेत्यांमधून प्रतिक्रिया येत आहेत. खासदार संजय राऊत यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिलीय. ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा एका विशिष्ट पक्षाचा प्रचार करणारा आणि दुसऱ्या पक्षाच्या विरोधात प्रचार करणारा सिनेमा आहे. या सिनेमाचा एका पक्षाने खूप प्रचार केला. त्यामुळे या सिनेमानंतर काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले. सर्वात जास्त हत्या झाल्या, असं संजय राऊत म्हणालेत.

काय म्हणाले नदाव लॅपिड?

चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक गोव्यात पोहोचले होते. दरम्यान, इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर आणि या चित्रपटाच्या इफ्फीमधील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. इफ्फीच्या ज्युरीचे अध्यक्ष इस्रायली दिग्दर्शक नदाव लॅपिड म्हणाले की, ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने आम्हा सर्वांना व्यथित केले आणि आम्हाला प्रचंड धक्का बसला. अशा प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाच्या कलात्मक आणि स्पर्धात्मक विभागासाठी हा चित्रपट अतिशय अयोग्य वाटला. माझ्या या चित्रपटाविषयी असणाऱ्या भावना मी उघडपणे मांडतोय. कारण इतक्या प्रतिष्ठित महोत्सवात अशा प्रकारच्या कठोर टीका या व्हायलाच हव्यात..!’ असंही ते म्हणाले.

हे ही वाचा :

The Kashmir Files ‘खोटं किती उंच झालं तरी….’ अनुपम खेर यांचं सुचक वक्तव्य

Nadav Lapid काश्मीर फाईल्सला ‘अश्लील’ म्हणणारे ‘नदाव लॅपिड’ आहे कोण?

‘The Kashmir Files’ प्रोपगेंडा फिल्म, IFFIच्या ज्युरींचं मत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss