हे फायनल करा; नारायण राणेंचा फोटो लावला २५ पैशांच्या नाण्यावर

हे फायनल करा; नारायण राणेंचा फोटो लावला २५ पैशांच्या नाण्यावर

सध्या राजकारणात नोटेवर कोणाचा फोटो छापला पाहिजे यावरून मोठी चर्चा रंगली आहे. अनेक नेतेयांकडून नोटेवर कोणाचे फोटो लावले पाहिजे हि चर्चा सुरू असतांनाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना विविध मुद्य्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सध्या देशात नोटांवर कोणत्या महापुरुषांचे फोटो पाहिजेत यावरून सुरू असलेल्या राजकारणावरही आपलं मत व्यक्त केलं. देशभरात चलनी नोटांवर कुणाचा फोटो लावायचा यावरून राजकीय नेत्यांमध्ये  जणू स्पर्धाच रंगली आहे. अनेकांनी अनेक महापुरुषांची नावे सूचवली आहे. काहींनी देवदेवतांची नावे सूचवली आहेत. तर काहींनी विद्यमान राजकीय नेत्यांचीही नावे सूचवली आहे. राज्यातूनही अनेक पक्षांनी नोटांवर कुणाचा फोटो असावा याची नावे सूचवलेली आहे. राजकीय नेत्यांची ही स्पर्धा सुरू असतानाच सोशल मीडियातून काही लोकांमध्ये खोडसाळपणा सुरू आहे. कुणी तरी नाण्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांचा फोटो छापावा असं म्हटलं आहे. तसेच राणेंचा फोटो असलेला चलनी नाण्याचा फोटोही व्हायरल केला आहे. या खोडसाळपणावर भाजपमधून  तीव्र प्रतिक्रिया उमटली असून प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आहे.

तर आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. २५ पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो एडिट करून, संबंधित नाणं फायनल करा, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. या प्रकारानंतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी भाजपाच्या युवा मोर्चाने कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित फोटो नेमका कुणी संपादित (एडिट) केला याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. “अध्यक्ष महोदय हे फायनल करा” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. संबंधित फोटो सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

विविध राजकीय नेत्यांनी अनेक महापुरुषांची नावे सूचवली. यामध्ये काहींनी देवदेवतांची नावं सूचवली तर काहींनी विद्यमान राजकीय नेत्यांचीही नावे सूचवली. संबंधित महापुरुषांमध्ये अगदी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, अशा विविध नेत्यांची नावं सूचवली. या घटनाक्रमानंतर संबंधित राजकीय नेत्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

हे ही वाचा :

Viral video : बहिणीला गणित शिकवताना भाऊ रडू लागला, हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

प्रसाद लाड यांच्या आरोपानंतर, सुभाष देसाईंचं भाजप नेत्यांनाच चॅलेंज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version