अखेर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र, उद्धव ठाकरेंची घोषणा

अखेर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र, उद्धव ठाकरेंची घोषणा

काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात युती कधी होणार असा प्रश्न सर्वांचं पडला होता. तर आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली आहे. महाराष्ट्राची जनता वाट पाहत होती ती म्हणजे आमच्या युतीची त्या युतीची घोषणाआज मी करत आहे असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी सांगितलं आहे. सध्या महाराषट्रात अनेक मुद्द्यांचा राजकारण बाजूला पडलंय. तर शरद पवार आमच्यासोबत येतील अशी अशा बाळगतो .

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, मविआ मध्ये सामंजस्याचं राजकारण करण्याची नितांत गरज आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीतील्या घोळावरून ठाकरेंचा सल्ला. कोणी कोणत्या जागा लढवायच्या हे ठरवण्याची वेळ आली आहे. तर दुसऱ्याचं घर फोडून आपलं घर सावणारी अवलाद गाडून टाका. “आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म दिवस आहे. प्रकाश आंबेडकर आणि आम्ही पुढची वाटचाल एकत्र घेऊन जाण्यासाठी एकत्र आलो आहोत. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा हे स्नेही होते. दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि जीवाला जीव देणारे सहकारी एकत्र येऊन ‘देश प्रथम’ याचा विचार करुन पुढे जाणार आहोत. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र येत आहोत. पुढील राजकीय वाटचाल कशी असेल याच्याबद्दल आम्ही नंतर वेळेनुसार निर्णय घेऊच,” अशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

“निवडणुका आल्या की गरिबांचा उदोउदो करायचा, मात्र, गरिबांनी मतदान केल्यावर ते रस्त्यावर आणि यांची उड्डाणं सुरू होतात. हे थांबवण्याची गरज आहे. म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत,” असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

हे ही वाचा:

संजय राऊत म्हणाले, ही दोन पक्षाची युती नसून शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती

‘सँड शार्क’ भारतीय नौदलात सामील, आयएनएस वगीरवरून समुद्रात भारताची ताकद वाढली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version