अखेर शिंदे – फडणवीस सरकारचे बहुप्रतीक्षीत खाते वाटप जाहीर झाले

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

अखेर शिंदे – फडणवीस सरकारचे बहुप्रतीक्षीत खाते वाटप जाहीर झाले

शिंदे - फडणवीस सरकारचे बहुप्रतीक्षीत खाते वाटप

शिंदे आणि फडणवीस सरकारच बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर झालेलं आहे. अनेक दिवसांपासून या खातेवाटपाबद्दल अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते.तर त्याचप्रमाणे विरोधकांकडून देखील खाते वाटप कधी होणार असे, प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. पण अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे आणि खातेवाटप झालेलं आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

शिंदे गटातील ९ आणि फडणवीस गटातील ९ अशा एकूण १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर इतर १८ मंत्र्यांची खातेवाटपाची यादी पुढीलप्रमाणे आहे:

Exit mobile version