अखेर पदवीधर निवडणुकांचा निकाल लागला, २९,४६५ मतांनी सत्यजित तांबेंनी मारली बाजी

त्यामुळे आजच्या या लढतीत नाशिक पदवीधर निवडणूक मतमोजणीकडे लोकांचे सर्वाधिक लक्ष होते. तसेच सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात नक्की कोण जिंकणार अशी उत्सुकता प्रत्येकाला लागून होती.

अखेर पदवीधर निवडणुकांचा निकाल लागला, २९,४६५ मतांनी सत्यजित तांबेंनी मारली बाजी

गेल्या कितीतरी दिवसांपासून राज्यात पदवीधर निवडणुकांमुळे वातावरण चांगलच तापलंय. त्यातच अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी दाखल केलेल्या अर्जामुळे हे वातावरण अजूनच तापले होते. आज अखेर महाराष्ट्रातल्या या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. ज्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe)  यांनी पाचव्या फेरीअखेर एकूण ६८ हजार ९९९ मतं मिळवली. तर शुभांगी पाटील यांना फक्त ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं. शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा तब्बल २९ हजार ४६५ मतांनी पराभव झालाय.आजच्या निवडणुकीत निकालात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आता सुरू झाली आहे तर, आतापर्यंत पाचपैकी तीन जागांचा निकाल जाहीर झाला असून इतर दोन जागांवर मतमोजणी सुरू आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने बाजी मारली असून नागपूर मतदार संघात त्यांना मविआ समर्थित उमेदवाराकडून पराभव स्विकारावा लागला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातदेखील आता मविआने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंनी भाजपच्या किरण पाटलांचा औरंगाबादात पराजय केला आहे. तर, अमरावती पदवीधर, नाशिक पदवीधर मतदारसंघाची आता मतमोजणी सुरू आहे. या ठिकाणी भाजप जरा पिछाडीवर आहे तर, नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते.

निकालापूर्वी काय म्हणले होते सत्यजित तांबे?

सत्यजित तांबे ट्वीटद्वारे म्हणतात, “विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत, पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती.”

हे ही वाचा:

सलग तिसऱ्यांदा बदलली Rocky Aur Rani Ki Prem Kahani ची रिलीज डेट, ‘या’ तारखेला ठोठावणार चित्रपटगृहाचे दार

सत्यजित तांबे विजय वाटचालीवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version