Kishori Pednekar यांच्यासह अन्य चार जणांवर एसआरए प्रकरणी FIR दाखल

Kishori Pednekar  यांच्यासह अन्य चार जणांवर  एसआरए प्रकरणी FIR दाखल

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात वरळी येथील गोमाता एसआरए प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.भाजपचे माजी खाजदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) या संदर्भात माहिती पुरवली असून किरीट सोमय्या यांनी त्यांच्या ट्विटर वरील अधिकृत खात्यावरून ट्विट केले आहे.

काही दिवसांपूर्वी ‘एसआरए’योजनेंतर्गत झालेल्या बनावट कागदपत्री आणि फसवणूक या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाई देखील केली होती. या प्रकरणी पेडणेकर यांचे वरळीमधील गोमाता नगरमधील कार्यालय आणि घर सील करण्यात आले होते. त्यानंतर आता किशोरी पेडणकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाला आहे. वरळी येथील गोमाता इमारत ही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बांधण्यात आली आहे.यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी बेकायदेशीरपणे या इमारतीमधील सदनिका बळकावेळा असल्याचा आरोप केला होता. पण आता किशोरी पेडणेकर यांना याप्रकरणी कोर्टाकडून समन्स देखील जारी करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी त्यांच्या ट्विट मध्ये असे लिहिले की ‘किशोरी पेडणेकर आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य फसवणुकीत सहभागी आहेत. किशोरी पेडणेकर,त्यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर (Kishori Pednekar) ,किश किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड आणि अन्य चार जणांच्या विरोधात २०१२ मध्ये फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणी समन्स जारी करण्यात आले होते. त्यांच्या कंपनीला कोविड काळाच कोटींचे कंत्राट मिळाले. कोर्टाने आरोपींना ६ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे’. असे किरीट सोमय्या (Kirit Somaiya)
यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात सहकारी अधिकारी असलेले उदय पिंगळे यांनी ही तक्रार दाखल केली असून या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय दंडविधान संहिता (IPC) ४१९, ४२०,४६५,४६८, ४७१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

Makar Sankranti 2023, संक्रांतीचा पुण्यकाळाबद्दल सविस्तर घ्या जाणून

Makar Sankranti 2023 मकरसंक्रांतीच्या निमित्ताने घरी बनवा साऊथ इंडियन स्पेशल पोंगल

Makar Sankrnati 2023, संक्रांती संदर्भात काही विशेष बाबी घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version