फायर आजींनी मातोश्रीवर जाऊन आदित्य ठाकरेंची घेतली भेट

तो आपल्यातून गेला... तुम्ही काळजी करायची नाही. तुमच्यापाठीमागे आम्ही शिवसैनिक आहोत.

फायर आजींनी मातोश्रीवर जाऊन आदित्य ठाकरेंची घेतली भेट
“झुकेंगे नहीं” म्हणत शिवसेनेच्या ‘फायर’ आज्जींचा रुद्र अवतार गेले दोन दिवस महाराष्ट्राने पाहीला. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत राज्यभर आंदोलनं केली आहेत. आता 92 वर्षांच्या आजीही पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसाठी पुढे आल्या आहेत. या आजीने हटके स्टाईलने शिवसेनेच्या विरोधकांना इशारा दिला आहे. 92 वर्षांच्या शिवसेनेच्या फायरबॅण्ड आजी चंद्रभागा शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं समोर आले आहे. आजी जवळपास तासभर मातोश्रीमध्ये होत्या. एकीकडे आज परभणीच्या खासदारांसह इतर पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली असतांना आजींना मात्र एन्ट्री मिळाली आहे.
आदित्य ठाकरे देखील आजींना भेटले आणि त्यांची चौकशी केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत ठरतोय. आजींना बघून आदित्य ठाकरेंना किती आनंद झालंय हे या व्हिडीओ मधून दिसून येतंय. आजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हणाल्या की, साहेब काळजी करु नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचं चंद्रभागा शिंदे यांनी म्हणाल्या. रिक्षावाला होता, त्याला आमदार केला. तरी तो आपल्यातून गेला… तुम्ही काळजी करायची नाही. तुमच्यापाठीमागे आम्ही शिवसैनिक आहोत. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर शिवसेनेच्या फायर आजी चंद्रभागा शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Fire Aaji meet Aditya Thackrey at Matoshree
यावेळी त्यांनी तुम्ही काळजी करु नका, शिवसैनिक तुमच्यासोबत असल्याचं उद्धव ठाकरेंना सांगत दिलासा दिलाय. तसेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊ नये, असेही आजींनी सांगितले. बंडखोर आमदार माघारी येणार का? या प्रश्नावर बोलताना आजी म्हणाल्या की, कट्टर शिवसैनिक असले तर साहेबांकडे माघारी येतील.. जे गेले ते गेले ते शिवसैनिक नाहीतअसे आजी म्हणाल्या. एकनाथ शिंदे माफी मागायाला येतील उद्धव ठाकरे त्यांच्याकडे जाणार नाहीत, असेही आजींनी सांगितलेय.
Exit mobile version