आधी मराठा आरक्षणासाठी काळे झेंडे; नंतर स्टेजवरूनच मुख्यमंत्री शिंदेंच्या जयजयकारी घोषणा..!, खासदार श्रीकांत शिंदेंची कलाकारी

आता हेडिंग वाचून तुम्हाला वाटले असेल की हे नक्की काय गौडबंगाल आहे बाबा..? काळे झेंडे दाखविणारे कसे काय समर्थनात जयजयकाराच्या घोषणा देऊ शकतात… तर तुम्ही विचार करताय ते योग्यच आहे…

आधी मराठा आरक्षणासाठी काळे झेंडे; नंतर स्टेजवरूनच मुख्यमंत्री शिंदेंच्या जयजयकारी घोषणा..!, खासदार श्रीकांत शिंदेंची कलाकारी

आता हेडिंग वाचून तुम्हाला वाटले असेल की हे नक्की काय गौडबंगाल आहे बाबा..? काळे झेंडे दाखविणारे कसे काय समर्थनात जयजयकाराच्या घोषणा देऊ शकतात… तर तुम्ही विचार करताय ते योग्यच आहे… सध्या बिघडलेल्या राजकीय वातावरणात सहसा असं होत नाही… पण ज्यांच्या कामात प्रामाणिकपणा असतो, आणि त्या कामाबद्दल ओतप्रोत आत्मविश्वास असतो तेच हा चमत्कार करू शकतात.. नेमकं तेच रविवारी घडले… पाथरी येथील शिवसेनेच्या रोजगार मेळाव्यातील जाहीर सभेत…!

शिवसेना पक्षाचे अल्पसंख्याक आघाडी प्रमुख सईद खान यांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात “ भव्य रोजगार मेळावा” भरवला होता. मेळाव्यासाठी खा. डॉ श्रीकांत शिंदे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्या मेळाव्यातच असलेल्या भरसभेत जेंव्हा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे बोलायला उभे राहिले. जशी त्यांनी भाषणाला सुरवात केली; तसे ५/६ तरुणांनी काळे झेंडे घेऊन “मराठा आरक्षण” संदर्भात घोषणा द्यायला सुरवात केली.. “ एक मराठा- लाख मराठा” आपसूक सगळाच जमलेला आजूबाजूचा जमाव शांत झाला.. स्टेजवरील पदाधिकारी यांच्यातील घालमेल वाढली.. पोलिसांची तारांबळ उडाली..! सगळ्यांच्याच मनात धस्स झालं… आता काय होणार?? सभा होणार की गदारोळ…!

तितक्यात या शांतेतला आणि थिजलेल्या विचारांना चिरत एक गंभीरपणे खर्जातल्या आवाजात एक सूचना झाली…. “या वरती या स्टेजवर… यांना सन्मानाने आणा रे स्टेजवर”… सगळेच स्तब्ध..! जनसमुदाय अवाक, पोलीस पण स्तब्ध …पण हीच वेळ असते आपण विचारांनी, कृतीने आदर्श उभा करण्याची… जे आपल्या संस्काराच्या जोरावर त्यांनी केले… आणि परभणी जिंकले.. अख्खं मैदान त्यांनी ताब्यात घेतलं..! स्टेजवर आल्यावर या तरूणांशी सन्मानाने चर्चा केली.. सरकार काय करत आहे… मुख्यमंत्री शिंदे काय करत आहेत हेही सांगितले.. मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची घेतलेली शपथ ते कोर्टाचा प्रवास, दिलेले कुणबी दाखले, सरकारचे धोरण सगळेच सांगितले..! “संघर्ष केल्यानेच सर्व प्रश्न सुटतात असे नाही; समन्वयातून ही मार्ग काढता येतो.!” असे म्हणत आपली प्रगल्भात ही दाखवली..!

हे सगळे तसे एका पठडीतल्या विचारांना छेद देणारे..! निषेध केला की त्यांना उचला, बाहेर घ्या, पोलिसी खाक्या दाखवा… हे असे चक्र भेदून त्यांच्या विचारांचा मान ठेवून त्यांना खासदारांनी सन्मान दिला.. हे दुर्मिळच.! सन्मानच दिला असेही नाही; आपला मुद्दाही समजवला..! मैदान आधीच भारावलेले त्यात या निषेधासाठी आलेल्या तरुण टीमची भर पडली..! त्यांनीही माईक हातात घेतला आणि विश्वास व्यक्त केला “ हे शिंदेसाहेबच करू शकतात..” हा असतो चमत्कार..! आणि हे करू शकतात डॉ श्रीकांत शिंदे..!

वाघाच्या छाव्याला शिकारीचे सूत्रं समजावावे लागत नाही हेच खरं!

हे ही वाचा:

पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील चार विद्यार्थिंनीचा देवगडच्या समुद्रात बुडून मृत्यू

जालन्यात धनगर समाज आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग टायर पेटवून आंदोलन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version