Saturday, July 6, 2024

Latest Posts

संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा एल्गार, हंगामी अध्यक्ष पॅनलवर टाकला बहिष्कार

यंदा नवनिर्वाचित खासदारांनी पहिल्यांदाच लोकसभेच्या दालनात पाऊल टाकलं. त्याचबरोबर विरोधकांनी देखील संसदेच्या पहिल्याच्या दिवशी बहिष्कार टाकत विरोध केला. हंगामी अध्यक्षाच्या पॅनलवर विरोधकांनी बहिष्कार घातला. 

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि मोदींचा तिसरा कार्यकाळ सुरु झाला. १८ व्या लोकसभेचं(18 loksabha first session) अधिवेशन आज २४ जून पासून सुरु झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या सरकारचं पहिलच अधिवेशन सुरु झालं. अधिवेशनाआधी देशाला मजबूत करण्याचा संकल्प पंतप्रधानांनी केला. यंदा नवनिर्वाचित खासदारांनी पहिल्यांदाच लोकसभेच्या दालनात पाऊल टाकलं. त्याचबरोबर विरोधकांनी देखील संसदेच्या पहिल्याच्या दिवशी बहिष्कार टाकत विरोध केला. हंगामी अध्यक्षाच्या पॅनलवर विरोधकांनी बहिष्कार घातला.

१८व्या लोकसभेच्या अधिवशेनाला(18 loksabha first session) पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी शपथ घेत सुरुवात केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हंगामी अध्यक्षाची निवड अधिवेशाआधीच केली होती त्यानुसार “भर्तृहरि महताब”(Bhartruhari Mahtab) यांची निवड झाली. मात्र त्यावर काँग्रेसचे के. सुरेश, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय आणि डीएमकेचे टीआर बालू यांनी पॅनलवर बहिष्कार घातला. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू(Draupadi murmu) यांनी काँग्रेसचे के. सुरेश, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय आणि डीएमकेचे टीआर बालू या तिघांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु या तिघांनी देखील त्या पदावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच सत्रात विरोधकांचा गदारोळ पहायला मिळाला त्याचबरोबर संसदेचं कामकाज सुरु होण्याआधीच इंडिया आघाडीच्या खासदारांनी आंदोलन करुन सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं.

 

हंगामी अध्यक्ष म्हणजे काय ?

नव्या संसदेच्या सभागृहात नव्या लोकसभा अध्यक्षाची निवड बहुमताने केली जाते. जोपर्यंत ही निवड आणि बहुमत होत नाही तोपर्यंत हंगामी अध्यक्षाची निवड केली जाते. काही कालावधीकरिता लोकसभेचं कामकाज हंगामी अध्यक्ष सांभाळत असतात. लोकसभेत सर्वाधिक काळ सदस्य राहिलेल्या व्यक्तीची हंगामी अधयक्षपदी निवड केली जाते.हंगामी अध्यक्षाची निवड ही राष्ट्रपतींकडून केली जाते. हंगामी अध्यक्षांकडून काही तीन सहायक सदस्यांचा शपथविधी करुन घेतला जातो आणि त्यानंतर इतर सदस्यांचा शपथविधी पार पडतो.

दरम्यान, आज नवनिर्वाचित खासदारांनी लोकसभेत शपथ घेतली.त्याचबरोबर महाराष्ट्रातील मंत्री नितीन गडकरी(nitin Gadkari), मुरलीधर मोहोळ(Murlidhar mohol), पियुष गोयल(Piyush Goyal), प्रतापराव जाधव(Prataprao Jadhav) आणि रक्षा खडसे(Raksha khadse) यांनी आज शपथ घेतली. तर उर्वरित खासदारांचा शपथविधी सोहळा आज किंवा उद्या पार पडेल.

हे ही वाचा

Manoj Jarange Patil यांच्या मागणीचा हेतू राजकीय? आरक्षण म्हणजे खिरापत नाही, Laxman Hake यांचा हल्लाबोल

मुस्लिमांना देखील OBC मधून आरक्षण द्या, कसं देत नाही ते बघतोच; Manoj Jarange Patil यांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss