अगोदर महाराष्ट्राची बेळगाव, कारवार, बीदर, भालकी इत्यादी गावे महाराष्ट्राला द्या. छगन भुजबळांची मागणी

अगोदर महाराष्ट्राची बेळगाव, कारवार, बीदर, भालकी इत्यादी गावे महाराष्ट्राला द्या. छगन भुजबळांची मागणी

बेळगावमधील (Belgaum) हिरबागेवाडी (Hirbagewadi) टोलनाक्यावर (toll booth) महाराष्ट्राच्या (Maharashtra) वाहनांवर (vehicles) हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या (Kannada Rakshana Vedike) कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. बेळगावात महाराष्ट्राच्या १० वाहनावर हल्ला करण्यात आलाय. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच संतापाची लाट उसळली आहे. बेळगावात (Belgaum) कन्नडी गुंडांनी महाराष्ट्राच्या गाड्यांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेध नोंदवत महाराष्ट्राकडे (Maharashtra) वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा असा सज्जड दम माजी मंत्री छगन भुजबळ यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे. बेळगाव (Belgaum), कारवार (Karwar), बीदर (Bidar), भालकी (Bhalki) इत्यादी गावे महाराष्ट्राला द्या आणि नंतर कांगावा करा असा सज्जड दम हि भुजबळांनी दिला आहे.

कर्नाटक (Karnataka) सरकार महाराष्ट्राची (Maharashtra) गावे घेण्याची घोषणा करत आणि महाराष्ट्रातील सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. महाराष्ट्र सरकारने आता भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी करतानाच केंद्राने देखील यात हस्तक्षेप करून कर्नाटक सरकारला कडक समज दिली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. हे प्रकरण कोर्टात असताना या प्रकरणाला चिथावणी कोण देत आहे, याची माहिती देखील घेतली गेली पाहिजे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जर कर्नाटकाने गुंडगिरी थांबवली नाही तर पुन्हा एकदा गनिमी कावा दाखवावा लागेल असा इशारा दिला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कर्नाटक सरकारवर आगपाख केली असून राज्य सरकारने भूमिका घेणे गरजेचे होते, मात्र ती घेतली जात नाही. आज हल्ले झाले, त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. येत्या २४ तासात वाहनावरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल आणि जे होईल त्याला कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा शरद पवारांनी दिला. तर भुजबळ म्हणाले, इतर गावांची मागणी करणाऱ्या कर्नाटकने अगोदर महाराष्ट्राची बेळगाव, कारवार, बीदर, भालकी इत्यादी गावे महाराष्ट्राला द्या आणि नंतर कांगावा करा ही दादागिरी आणि गुंडगिरी महाराष्ट्र खपवून घेणार नाही मराठी माणसाला त्याचे उत्तर देता येत नाही, असे नाही पण महाराष्ट्राच्या संयमाचा अंत कर्नाटकने पाहू नये असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा : 

विवेक अग्निहोत्रीला दिल्ली हायकोर्टाची माफी मागावी लागली, जाणून घ्या कारण

संभाजीराजे छत्रपती यांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी, अजित पवार

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version