आधी ठाण्यात मनसे आणि आता कोल्हापूरात शिवसैनिक यांचा आक्रमक पावित्रा; जाणूयात सविस्तर

आधी ठाण्यात मनसे आणि आता कोल्हापूरात शिवसैनिक यांचा आक्रमक पावित्रा; जाणूयात सविस्तर

महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर बीडमध्ये त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. या हल्ल्यामागे ठाकरे गटातील पदाधिकारी सामील असल्याचा दावा करत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत माझ्या नादी लागू नका, असा इशारा दिला. यानंतर काहीच तासांत ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये  काल (१० ऑगस्ट) मोठ्याप्रमाणावर मनसेसैनिकांकडून हल्लाबोल करण्यात आला. अक्षरशः उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण, टोमॅटो आणि बंगाड्या फेकून मारल्या गेल्या. चार ते पाच गाड्यांचे नुकसान झालं.

वाहन चालकाच्या दिशेने नारळ वेगाने आल्याने वाहनचालकांमध्ये अपघात होण्याची भीती निर्माण झाली. त्याच सोबत हॉलच्या आतल्या बाजूस उभे केलेले स्टॅन्ड हे मोठ्याप्रमाणावर तोडण्यात आले. कार्यकर्त्यांमध्ये मारामारीसुद्धा झाली. मात्र वाहनचालकांनी गाडीवर नियंत्रण मिळवत गाडी कंट्रोल केली. सर्वात पुढे ताफ्यामध्ये चेंबूरचे विभाग क्रमांक ९ चे प्रमुख प्रमोद शिंदे (Prmod Shinde) यांच्या गाडीवर नारळ भिरकावले असून त्यांचा वाहन चालक थोडक्यात बचावला. या संपूर्ण परिस्थितीचा परिणाम राज्यभर दिसून आला. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. कोल्हापुरात शिवसैनिकांनी मनसे शाखा फलकांना काळे फासत तोडफोड केल्याची घटना समोर आली. ठाण्यात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी शहरात बंदोबस्तात वाढ केली आहे. यातच कोल्हापुरात संतप्त शिवसैनिकांनी शहरातील मनसेचे शाखांवरील बॅनरला काळ फासून तोडफोड केली.

अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यावर कार्यवाही करण्यात आली :

उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर वागळे इस्टेट येथील विभाग प्रमुख प्रितेश राणे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, अविनाश जाधव, प्रितेश मोरे, आकाश पवार, अरुण जेटलु, मनोज चव्हाण, यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात त्यांनी म्हटले की, ‘तुम्ही आमच्या राज साहेबांच्या ताफ्यावर सुपारी फेकून मारल्या. त्यामुळे आम्ही उत्तर दिले. तुम्ही सुपारी फेकली तर आम्ही नारळ फेकू. यापुढे राज ठाकरे यांच्याविरोधात काही बोलल्यास घरात घुसून मारू, असेही त्यांनी म्हटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Exit mobile version