”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो”; संभाजी भिडे

”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो”; संभाजी भिडे

आपल्या वादग्रस्त भूमिका आणि वक्तव्यावरून संभाजी भिडे हे नेहेमी चर्चेत असतात. आज संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले असतांना साम टीव्हीच्या पत्रकारितेचा अपमान केल्याची बातमी मिळत आहे. कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आल्यानंतर त्यांच्याशी एका महिला पत्रकारानं संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलेनं अशा शब्दांत भिडे यांनी बोलण्यास नकार दिला. पण हा एका महिलेचा अपमान असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

आज पुन्हा एकदा संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. संभाजी भिडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे वादग्रस्त विधान केले आहे. संभाजी भिडे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले असताना साम टिव्हीच्या महिला पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला. यावेळी बोलताना त्यांनी ”प्रत्येक स्त्री भारतमातेस्वरूप असते. भारतमाता ही विधवा नाही. त्यामुळे तू आधी कुंकू लाव, मगच मी तुझ्याशी बोलतो”, असे वादग्रस्त विधान केले.

त्यानंतर सगळीकडून संभाजी भिडे यांच्यावर टीकेची झोड इथली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील म्हणाल्या, “मुळात बाईनं टिकली लावायची की नाही हा तिचा वैयक्तिक अधिकार आहे. ती कुठल्या धर्माची आहे हे महत्वाचं नाही. कारण कुठल्या धर्मात जन्माला येताना धर्म मागून जन्माला येत नसतं. भिडे गुरुजींचं कुठे मनावर घेता, ते आता म्हातारं माणूस झालेले आहेत. ते साठी बुद्धी नाठी म्हटलं तरी चालेल, अशा माणसांचे बाईटच घेऊ नयेत. हे महिलांना अपमान करत आहेत, पूर्वीची प्रथा ते परत आणू इच्छित आहेत”. तर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि उप नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, “संभाजी भिडे यांनी कोणत्या धर्माचं पालन करावं, कोणता धर्माची आचारसंहिता मानावी हा सर्वस्वी भिडे यांचा प्रश्न आहे. पण भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण तीन कलम १९ मध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की, कुठल्याही व्यक्तीला त्याच्या धर्माप्रमाणं राहण्याचा, आचरण करण्याचा स्वातंत्र्य आहे. त्यामुळं कुठलीही वेशभुषा करावी यावर इतर कोणी भाष्य करु नये. हा प्रकार निषेधार्ह आहे. याद्वारे तुम्ही एखाद्याच्या आचार स्वातंत्र्याचा घाला आहे”.

हे ही वाचा :

‘बदल्यांच्या नावाखाली मंत्री अधिकाऱ्यांकडून खंडणी वसूल करतात’,राजू शेट्टींचा राज्य सरकार गंभीर आरोप

भारतचा बांगलादेश विरोधात ५ धावांनी विजय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version