RAJ THACKERAY पाच वर्षानंतर राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ते आज दुपारी पुण्याहून कोल्हापूरला (kolhapur) पोहोचतील.

RAJ THACKERAY   पाच वर्षानंतर राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ते आज दुपारी पुण्याहून कोल्हापूरला (kolhapur) पोहोचतील. तब्बल ५ वर्षानंतर राज ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची कोल्हापूरकरांनी जोरदार तयारी केली आहे. आज राज ठाकरेंना पंढरपुरातील माऊली कॉरिडॉरला विरोध करणारे सर्व पक्षीय शिष्टमंडळ कोल्हापुरात विश्रामगृहावर भेटणार आहे.

दरम्यान, राज ठाकरे हे ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा दौरा देखील करणार आहेत. आज दुपारी ४ वाजता राज ठाकरे कोल्हापुरात आल्यानंतर ताराबाई पार्क येथील शासकीय सर्किट हाऊसमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर तिथेच ते त्यांच्या जुन्या काही मित्रांनाही भेटणार आहेत. बुधवारी (३० नोव्हेंबर) राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करतील. कोकण दौऱ्यावर जाण्यापूर्वी ते अंबाबाई मंदिरात भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी ते सावंतवाडीच्या दिशेनं रवाना होतील. सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी इथे ते पोहोचतील. कुडाळ येथे राज ठाकरेंचा मुक्काम असेल. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांचा राज ठाकरे दौरा करतील.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षातील पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. मनसेच्या बैठकीत राज ठाकरे यांनी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे कोल्हापूरमधील मनसैनिकांना ते काय कानमंत्र देणार? याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी शनिवारी (२७ नोव्हेंबर) गोरेगावमधील नेस्को सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यासह उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. सोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सल्ला देत टोलेबाजी केली होती. महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत. नरेंद्र मोदी यांनी पहिली पाच वर्षे उत्तर प्रदेश बिहार आणि उत्तराखंडकडे लक्ष द्यावे. त्या राज्यांमधील लोकं घरदार सोडून दुसऱ्या राज्यात जातात, त्यावेळी दुसऱ्या राज्यांना त्याचा त्रास होतो. आज दोन प्रकल्प जातात याचे वाईट एका गोष्टीचे वाटतं. कुठल्याही राज्यात प्रोजेक्ट केले त्याचं वाईट नाही वाटतं. सर्व राज्यांची प्रगती झाली तर देश प्रगत होतो. नरेंद्र मोदीजी, तुम्ही गुजरात गुजरात करू नका, प्रत्येक राज्य तुमचं अपत्य आहे, त्या प्रत्येक राज्याकडे समान पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. ही आपली धारणा होती, आहे आणि राहिल, असं राज ठाकरे म्हणाले होते. तसेच राज्यपाल पदावर बसलात म्हणून मान राखतो, नाहीतर राज्यात शिव्यांची कमतरता नाही. कोश्यारीजी आधी त्या गुजराती आणि मारवाडीला विचारा तुम्ही महाराष्ट्रात का आला? महाराष्ट्रसारखी सुपीक जमीन उद्योगासाठी मिळाली म्हणून ते आलेत, महाराष्ट्र नेहमी मोठा असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते.

हे ही वाचा:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई गटध्यक्ष मेळावाच्या सभास्थळी रवाना

राज ठाकरेंचा राहुलगांधींवर खरपुस शब्दांत टीका

Raj Thackeray melava LIVE : कोरोना काळात ठाकरेंनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version