ठाण्यात मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ध्वजारोहण

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त (Independence Day 2022) ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. ठाणे (Thane) शहरातील तलावपाली भागात असलेल्या शिवसेना (Shiv Sena) जिल्हा शाखेत स्वातंत्र्यदिनानिमित्ताने रात्री १२.०१ मिनीटांनी ध्वजारोहण करण्याची परंपरा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम ठेवली आहे.

ठाण्यात मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ध्वजारोहण

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त (Independence Day 2022) ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. ठाणे (Thane) शहरातील तलावपाली भागात असलेल्या शिवसेना (ShivSena) जिल्हा शाखेत स्वातंत्र्यदिनानिमित्ताने रात्री १२.०१ मिनीटांनी ध्वजारोहण करण्याची परंपरा एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम ठेवली आहे. आनंद दिघे (Anand Dighe) जिल्हाध्यक्ष असताना मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची चाळीस वर्षापुर्वीची परंपरा मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवली असल्याचं हे दिसून आलं आहे. एकनाथ शिंदेंच्या हस्ते झालेल्या या ध्वजारोहण (Flag hoisting) कार्यक्रमाला मोठ्या संख्यने शिंदे समर्थक उपस्थित होते. पण महत्वाचं म्हणजे, या कार्यक्रमात शिंदे गट विरुद्ध उद्धव गट असा सामना देखील रंगणार होता. कारण ठाकरे गटात असलेले राजन विचारे यांना पोलिसांची नोटीस देऊनसुद्धा ते या कार्यक्रमात हजर होते. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री १२ वाजता ठाण्याच्या शिवसेना शाखेत ध्वजारोहण केलं. यावेळी शेकडो नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत आहे. देशभक्तीची लाट नागरिकांमध्ये उत्पन्न झाली आहे. सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. ज्ञात अज्ञात सेनानींनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, त्यांना अभिवादन करतो. आनंद दिघे यांनी ही ठाण्यात परंपरा सुरू केली त्याचा आनंद होतोय, राज्यातही घराघरावर तिरंगा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.” तसेच राजन विचारेंच्या उपस्थितीबद्दल विचारले असता मुखमंत्री म्हणाले, “मी पोलिसांना सूचना दिल्या होत्या की जे सहभागी होतील त्यांना येऊ द्या” असं उत्तर दिलं. मंत्रिमंडळातील खातेवाटबाबातही त्यांनी यावेळी भाष्य केलं. ते म्हणाले की, “ज्या विभागाची जबाबदारी, ज्या मंत्र्यांवर दिलेली आहे, ती यशस्वीपण पार पाडतील, आता ते राज्याचे मंत्री आहेत.”

हे ही वाचा :-

अखेर शिंदे – फडणवीस सरकारचे बहुप्रतीक्षीत खाते वाटप जाहीर झाले

अमेरिकेच्या हडसन नदीच्या तटावर फडकणार तिरंगा

Exit mobile version