spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदे पाठोपाठ ठाकरे गटाचा देखील टीझर लाँच; एक नेता, एक झेंडा, एक मैदान…

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर केवळ महाविकासआघाडी सरकार कोसळलं नाही, तर शिवसेना कुणाची हाच प्रश्न निर्माण झालाय. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर केला असला, तरी राजकीय आखाड्यातही पक्षावरील मालकी सिद्ध करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटा आमनेसामने आले आहेत.

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर केवळ महाविकासआघाडी सरकार कोसळलं नाही, तर शिवसेना कुणाची हाच प्रश्न निर्माण झालाय. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर केला असला, तरी राजकीय आखाड्यातही पक्षावरील मालकी सिद्ध करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटा आमनेसामने आले आहेत. याचाच भाग म्हणून दोन्ही गटांनी बाळासाहेब ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या परंपरेवर दावा केलाय. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याचा टीझर लाँच केला. आता ठाकरे गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा टीझर लाँच केला आहे.

दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अश्यात आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. निष्ठेचा सागर उसळणार, असं या टीझरमध्ये म्हणण्यात आलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होता आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे टीझर ट्वीट करण्यात आलं आहे. हे ट्वीट करताना म्हटलं आहे, एक नेता, एक झेंडा, एक मैदान… शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा! अशी कॅप्शनदेखील देण्यात आली आहे. एक मैदान हा कॅप्शनमधील उल्लेख लक्षवेधी ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हा दसरा मेळावा ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार आहे.

 ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या टीझरमध्ये काय?

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या टीझरची सुरुवात शिवसेनेच्या भगव्या झेंड्यापासून होते. नंतर पुढे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि डरकाळी फोडणाऱ्या वाघाचा फोटो दिसतो. यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि मग निष्ठेचा सागर उसळणार असं लिहिलेलं दिसतं. विशेष म्हणजे या ३५ सेकंदाच्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे सभेसमोर भाषण देतानाचे फोटो आणि उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थित जनसमुदायाचे चित्रणही ठळकपणे दाखवण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्राची ताकद दिसणार असंही म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील टीझरचं ट्वीट रिट्वीट केलं आणि शिवसैनिकांना “वाजत गाजत, गुलाल उधळत या… पण शिस्तीत या,” असं आवाहन केलं. उद्धव ठाकरे ज्या स्टाईलने भाषणाची सुरुवात करतात तेही दाखवण्यात आलं आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवांनो, भगिनींनों आणि मातांनो…, हाी त्यांची भाषणाची सुरूवात यात दाखवण्यात आली आहे.

 शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. दादर, माहिम, प्रभादेवी परिसरात शिवसैनिकांच्या स्वागतासाठी विशेष गेट उभारण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी स्क्रीन दादर आणि आजूबाजूच्या परिसरात लागणार आहे. दादर-प्रभादेवी परिसर भगवामय करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा:

नवनियुक्त पालकमंत्री दादा भुसेंनी नाशिककरांचे मानले आभार !

Vikram Vedha : OTT प्लॅटफॉर्मवर हृतिक-सैफचा विक्रम वेध हिंदीमध्ये पहा विनामूल्य…

परतीच्या पावसाची बॅटिंग; येत्या तीन दिवसांत विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss