spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदे गटाच्या आमदाराच्या मुलाकडे बिल मागितलं म्हणून, चक्क हातपाय तोडण्याची दिली धमकी

महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेत असलेलं शिंदे फडणवीस सरकार कुठल्या ना कुठल्या विषयावरून वादात सापडत आहे. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाने केटरिंग व्यावसायिकाला हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीये. वाढदिवसाच्या पार्टीचं शिल्लक बिल मागण्यासाठी केटरिंग व्यावसायिकाने संजय शिरसाट यांच्या मुलाला फोन केला होता. मात्र तू माझ्या डोक्याला ताप देऊ नकोस, साहेबांनी दिले तेवढेच पैसे घे नाहीतर हातपाय तोडेन, अशी धमकी सिद्धांत शिरसाट यांनी व्यावसायिकाला दिली.

त्रिशरण गायकवाड पुढे म्हणाले की, आमदार संजय शिरसाट यांचे एकूण पावणेपाच लाख रुपयांचे बिल झाले होते. मात्र, त्यातले अजून ७५ हजार रुपये थकले होते. त्यांच्या एका शब्दांवर डिस्काऊंट केले. त्यानंतरही त्यांच्याकडे ४० हजार रुपये राहिले. त्यांनंतर आमदार संजय शिरसाट आणि सिद्धांत शिरसाट यांना बोललो. आमदार संजय शिरसाट ४० हजार देतो म्हणाले. मात्र, सिद्धांत भैय्यांनी २० हजार दिले. पैसे मागितले. मात्र, हातपाय तोडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. पैसे मिळाले पाहिजेत. त्यासाठी पोलिसात जाणार आहे. विशेष म्हणजे केटरिंग व्यावसायिक त्रिशरण गायकवाड आणि आमदार संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या धमकीची ऑडिओ क्लीपही व्हायरल झालीय.

धमकी क्लीपमधील संवाद

सिद्धांत शिरसाटः बाबाने जेवढे दिली. तेवढेच दिले. विषय संपला आता.

त्रिशरण गायकवाडः भाऊ अजून २० हजार बाकी आहेत ना भाऊ. भाऊ कामाचे पैसे आहेत ना. असं करू नका ना भाऊ. ७५ हजार रुपये तुमच्या एका शब्दांवर रिटर्न केले.

सिद्धांत शिरसाटः उपकार केले ना तू?

त्रिशरण गायकवाडः अरे भाऊ, तशी भाषा नका वापरू. कामाचे पैसे आहेत, ते देऊन टाका.

सिद्धांत शिरसाटः कोणत्या कामाचे पैसेयत तुझे?

त्रिशरण गायकवाडः त्याच कामाचे बाकी राहिलेत ४० हजार. १ लाख २५ हजार होते. तुमच्या शब्दांवर आपण ७५ हजार डिस्काउंट केले.

सिद्धांत शिरसाटः तुझं आता डोक्याच्या वर झालं बरं का आता. साहेबांसमोरच तुला २० हजार रुपये दिलते.

त्रिशरण गायकवाडः साहेबांनी ४० हजार बोलले होते. बाहेर आल्यावर मला २० हजार दिले.

सिद्धांत शिरसाटः तू का बरं बोलला नाही तेव्हा?

त्रिशरण गायकवाडः परत यावं लागेल ऑफिसवर आता. काय करणार.

सिद्धांत शिरसाटः परत आल्यावर तिथं तुझे हातपायच तोडतो बेट्या.

त्रिशरण गायकवाडः भाऊ असं नका ना बोलू तुम्ही.

सिद्धांत शिरसाटः असं नका बोलू म्हणजे?

त्रिशरण गायकवाडः कामाचे पैसे आहेत तेवढे देऊ टाका ना.

सिद्धांत शिरसाटः कुणाचं देणंय? कुठंय तू आता?

त्रिशरण गायकवाडः घरी होतो.

सिद्धांत शिरसाटः थांब येतो तिथं.

त्रिशरण गायकवाडः बरं

हे ही वाचा:

Cristiano Ronaldoने नव्या फुटबॉल क्लबशी केला करार, १७०० कोटींहून जास्त असणार वार्षिक वेतन

New Year 2023 नवीन वर्षात स्वतःसाठी करा हे ‘या’ पाच संकल्प, जीवनाला शिस्त लागण्यास होईल मदत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss