‘टोमणे मेळावा’साठी… मनसेचा शिवसेनेवर खोचक टोला

सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटात दसऱ्या मेळाव्यावरून जोरदार रस्सीघेच सुरु आहे. शिवसेना आणि शिवाजी पार्क मैदानावरील दसरा मेळावा हे समीकरण आहे. परंतु शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे यंदा शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात मेळाव्यासाठी चुरस निर्माण झाली.

‘टोमणे मेळावा’साठी… मनसेचा शिवसेनेवर खोचक टोला

सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटात दसऱ्या मेळाव्यावरून जोरदार रस्सीघेच सुरु आहे. शिवसेना आणि शिवाजी पार्क मैदानावरील दसरा मेळावा हे समीकरण आहे. परंतु शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे यंदा शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात मेळाव्यासाठी चुरस निर्माण झाली. शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी शिवसेनेबरोबरच शिंदे गटानेही अर्ज केला आहे. मात्र शिवतीर्थ कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान मिळावं याकरता शिंदे गटाने केलेला अर्ज ‘एमएमआरडीएने स्वीकारला आहे. तर शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला ते आरक्षित असल्याने फेटाळण्यात आलं आहे. या सर्व प्रकारावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील चांगलीच खोचक टिका शिवसेनेवर केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे (Maharashtra Navnirman Sena leader Gajanan Kale) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर सडकून टीका केली आहे. ‘टोमणे मेळावा’ म्हणत त्यांनी शिवेसनेना आणि पर्यायाने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) डिवचलं आहे. “मुंबई मनपा आणि राज्य सरकारने शिल्लकसेनेला शिवतीर्थावर ‘टोमणे मेळावा’साठी परवानगी देवून टाकावी. खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये.तसंही यावेळची स्क्रिप्ट बारामती वरूनच येणार आहे. अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी स्टेजवर असणार आहेत का?”, असं गजानन काळे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

राहुल गांधीच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाला पक्षातीलच नेत्यांचा विरोध

दसरा मेळावा वादात आता राऊतांची उडी, दिला मोलाचा सल्ला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version