Sunday, June 30, 2024

Latest Posts

इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागणार ‘या’ महिला अधिकारीची ; जाणूयात सविस्तर

..१९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ लाभणार असून जून २०२५ मध्ये त्या निवृत्त होणार आहेत.

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary of the State) महिला अधिकारीची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक (Sujata Saunik IAS) यांची सचिवपदासाठी निवड झाली असून त्या या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी असतील. सुजाता सौनिक यांनी या आधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे. सुजाता सौनिक या १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ लाभणार असून जून २०२५ मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता मावळते मुख्य सचिव नितीन करीर (Nitin Karir) यांच्याकडून त्या सूत्रे हाती घेणार आहेत.

विशेष म्हणजे सुजाता सौनिक याचे पती मनोज सौनिक यांनीदेखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. सुजाता सौनिक यांनी याआधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदी बढती मिळाली आहे. सुजाता सौनिक मुख्य सचिवपदी केवळ एक वर्षे राहणार आहेत. जून २०२५ मध्ये त्या सेवानिवृत्त होणार आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार, १९८७ च्या तुकडीतील गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (Rajesh Kumar) १९८८ आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) १९८९ हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात आहेत. त्यामध्ये सुजाता सौनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

कोण आहेत सुजाता सौनिक ?

सुजाता सौनिक यांनी आपले शैक्षणिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण चंदिगडमध्ये पूर्ण केले. त्यांनी इतिहास विषय घेऊन पंजाब विद्यापीठातून मास्टर्स केले आहे. आपल्या ३७ वर्षांहून अधिकच्या कारकिर्दीत सामान्य प्रशासन विभाग तसेच कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृह विभाग, राज्य सरकारच्या सल्लागार तसेच सहसचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

मुख्य सचिवपद भूषवणारे पहिले दाम्पत्य ?

सुजाता सौनिक राज्याच्या मुख्य सचिव झाल्यास इतिहास घडणार आहे. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक (Manoj Saunik) एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत राज्याचे मुख्य सचिव होते. निवृत्तीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे प्रधान सचिव म्हणून मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यास राज्याचे मुख्य सचिवपद भूषविणारे सौनिक हे देशातील पहिले दाम्पत्य असेल. सुजाता सौनिक मुख्य सचिव झाल्यास सुमारे सव्वा वर्षाचा कार्यकाळ सौनिक यांना मिळणार आहे. जून २०२५ अखेरीस त्या निवृत्त होतील.

एकंदरीतच राज्यात पहिल्यांदाच मुख्य सचिव पद हे एका महिलेला प्राप्त झालेले आहे. त्यामुळे ही भारतासाठीची अतिशय महत्वपूर्ण अशी घटना आहे. ज्यामुळे भारताची मान उंचावणारा हा प्रसंग असणार आहे. या पदाची शपथ त्या आज म्हणजे ३० जून २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता घेणार आहेत. त्यामुळे हा शपथविधी सोहळा पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे ही वाचा :

T20 WORLD CUP : PANDYA आणि NATASAचा व्हिडीओ कॉलवर संवाद ; नात्यात सर्वकाही अलबेल

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss