पहिल्यांदाच थेट जनतेमधून सरपंचांची निवड ; सत्तांतरानंतरचा पहिलाच गुलाल

राज्यातील शेकडो ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी (Gram Panchayat Election Results 2022) काल, रविवारी मतदान झाले.

पहिल्यांदाच थेट जनतेमधून सरपंचांची निवड ; सत्तांतरानंतरचा पहिलाच गुलाल

राज्यातील शेकडो ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी (Gram Panchayat Election Results 2022) काल, रविवारी मतदान झाले. आज या शेकडो गावांचे गाव कारभारी त्या त्या गावाला मिळणार आहेत. राज्यातील तब्बल ५४७ ग्रामपंचायतींचा निकाल आज लागणार आहे. राज्यातील तब्बल ६०८ पैकी ५४७ ग्रामपंचायतीसाठी ७६ टक्के मतदान झालं आहे. तर ६०८ पैकी ६१ जागांवर सरपंचाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारपर्यंत सर्व जागांवरील चित्र स्पष्ट होणार असल्याची शक्यता आहे.

राज्यात सत्तांतरानंतर ही पहिलीच निवडणूक (Election) असून १६ जिल्ह्यांतील तब्बल ६०८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी मतदान काल पार पडले. त्यामध्ये ६१ ग्रामपंचायतींवर सरपंचाची बिनविरोध निवड करण्यात आली असून ५४७ ग्रामपंतायतीसाठी मतदान पार पडले. तर आज या निवडणुकांचा गुलाल उधळणार आहे.

सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतल्यावर निवडणूक आयोगाने १२ ऑगस्ट रोजी राज्यातील ६०८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानंतर ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. तर उर्वरित ५४७ ग्रामपंचायतीसाठी काल मतदान पार पडले. तर आज मतमोजणी पार पडणार आहे. राज्यात सत्तांतरानंतर नव्या सरकराने थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर, त्या निर्णयानुसार पहिल्यांदा राज्यात निवडणुका पार पडणार असून राज्यातील ५४७ ग्रामपंचायतीवर थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत यांची आज सुटका होणार कि पुन्हा कोठडी ?

तुम्हाला सफरचं आवडतच असेल तर, आज आपण सफरचंदापासून खीर कशी बनवतात हे पाहू

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सेफ अली खानने उडवली ‘या’ अभिनेत्याची खल्ली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version