spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना पहाटेच केली पोलिसांनी अटक…

आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Ex Chief Minister Chandrababu Naidu) यांना आज पहाटे अटक करण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Ex Chief Minister Chandrababu Naidu) यांना आज पहाटे अटक करण्यात आली आहे. स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये घोटाळा (Skill Development Scam Case) केल्याचा नायडू यांच्यावर आरोप आहे. आंध्र प्रदेशमधील नंदयाला इथून सीआयडीनं (CID) अटक केली, तर त्यांचा मुलगा नारा लोकेश (Nara Lokesh) याला देखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. तेलगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. टीडीपीनं याबाबत माहिती दिली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं (CID) नायडू यांच्यावर शनिवारी (०९ सप्टेंबर) सकाळी कारवाई केली. नायडू यांच्यावर २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंदयाल शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये असलेल्या कॅम्पमध्ये विश्रांती घेत असताना नायडू यांना पहाटे ३.०० वाजता नांदयाल येथून अटक करण्यात आली. त्याला अटक करण्यासाठी डीआयजी रघुरामी रेड्डी (DIG Raghurami Reddy) आणि नंदयाल रेंजचे सीआयडी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा नांदयाल येथील आरके फंक्शन हॉल (RK Function Hall) परिसरात दाखल झाला होता.

चंद्राबाबूंच्या टीडीपीचे नेते, कार्यकर्ते आणि आंध्रप्रदेश सीआयडी पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यानंतर सकाळी ६.०० च्या सुमारास चंद्राबाबू नायडू व्हॅनमधून खाली उतरले आणि त्यांनी पोलिसांशी चर्चा केली. त्याच्या अटकेसाठी 51CrPC अंतर्गत नोटीस जारी करण्यात आली होती. नायडू यांनी या प्रकरणाचा तपशील मागितला. मात्र पोलिसांनी माननीय न्यायालयासमोर तपशील सादर केल्याचं सांगत तपशील देण्यास नकार दिला. नायडू यांची चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि रिमांड अहवाल देण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं. नायडू यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं मान्य केलं. अखेर पोलिसांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर अटकेची कारवाई केली. चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा आणि टीडीपी नेते नारा लोकेश यांना पूर्व गोदावरी जिल्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. टीडीपीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लोकेशचा व्हिडीओ देखील जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे की, ते (लोकेश) चंद्राबाबू नायडूंना भेटू शकत नाही.

कौशल विकास घोटाळ्यात (Skill development scams) चंद्राबाबू नायडू यांना आरोपी १ म्हणून नाव देण्यात आलं आहे, ज्यात २५० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पोलीस अधिकार्‍यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या वकिलांना कौशल विकास प्रकरणात आंध्रप्रदेश उच्च न्यायालयानं जारी केलेल्या एफआयआर (FIR) प्रत आणि इतर आदेशांची माहिती दिली आहे. दरम्यान, चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या वकिलांनी त्यांच्या नावाचा एफआयआर अहवालात उल्लेख नसल्याचं सांगत तपास अधिकार्‍यांना प्रथमदर्शनी पुरावे देण्याची विनंती केली आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी सीआयडी अधिकाऱ्यांना प्रश्न केला की, या प्रकरणातील त्यांच्या सहभागाबाबत कोणतीही माहिती न देता त्यांना अटक कशी केली जाऊ शकते? असं असलं तरी, अटक हा तपास प्रक्रियेचा प्राथमिक टप्पा असून, २४ तासांत रिमांड रिपोर्टमध्ये सर्व तपशील देण्यात येतील, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा: 

G-20 परिषदेला आजपासून सुरुवात, नेमकं काय होणार? कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

आज राज्यात ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जाणून घ्या…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss