spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात दाखल, महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावरून आक्रमक

सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnatak Conflict ) प्रचंड पेटला आहे आणि पडसाद हिवाळी अधिवेशनात सुद्धा दिसून येत आहेत. अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सहभाग नोंदवला आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरुन सत्ताधाऱ्यांचा ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावरुनही ठाकरेंनी टोलेबाजी केली.

दरम्यान, आपल्या निवेदनादरम्यान, उद्धव ठाकरे (Eknath Shinde) यांनी सभागृहात पेनड्राईव्ह (pen drive) आणल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरे म्हणाले, “विरोधीपक्षाने सीमावादाबाबत (Maharashtra Karnataka Border Dispute) प्रस्ताव मांडला आहे. सभागृहातील सर्वांचं या विषयाबाबत एकमत आहे. जवळपास ५६ वर्षापासून हा लढा सुरु आहे. ज्यावेळी भाषावार प्रांत रचना झाली त्या आधीपासून सीमाभागात मराठी भाषा (Marathi language) रुजलेली आहे. कित्येक वर्ष तिथे राहणारे नागरिक मराठी भाषा बोलतात. हा लढा राजकीय नाही. एक पेन ड्राईव्ह मी देणार आहे. १९७०च्या दशकात एक फिल्म सीमा भागातील नागरिकांवर केलेली आहे. अठराव्या शतकात त्याठिकाणी मराठी कशी वापरली जात होती. त्याचा उल्लेख आहे. ही फिल्म दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवा”.

हा भाषावार प्रांत रचनेचा विषय नाही. माणुसकीचा हा विषय आहे. इथ खालच्या सभागृहात काहीजण म्हणतात आम्ही लाट्या काठ्या खाल्ल्या आहेत. त्यावेळी तुम्ही सत्ताधारी पक्षात होतात, आता तुम्ही सीमा ओलांडली आहे. मुख्यमंत्री दिल्लीत गेले. खरंतर हा विषय सुरु असताना दिल्लीला जाणे योग्य आहे का? मुळात गृहमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर यांनी केलं काय? इथे आम्ही कायदा केला की महाराष्ट्रात मराठी पाट्या लागल्या पाहिजेत तर काही जण कोर्टात गेले. मुळात आपलं सरकारं कर्नाटक सरकारसारखी भूमिका मांडणार आहे का? असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरे यांनी विचारला.

हे ही वाचा : 

हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक, ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

मनालीमध्ये साताऱ्यातील युवकाचा भीषण अपघात, पॅराशूटचा बेल्ट निसटल्याने झाला दुर्दैवी मृत्यू

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss