spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

फॉक्सकॉनवर माजी उद्योगमंत्री देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले “गुजरातची कुठेच चर्चा नव्हती”

त्यावेळी आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली,

वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण आता तापताना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी शिंदे-फडणवीस आणि महाविकास आघाडीतील नेतेमंडळी आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

देसाई म्हणाले की, वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. आम्ही मागच्या एक-दीड वर्षापासून महाविकास आघाडी सरकारच्या मार्फत जोरदार प्रयत्न केले. मे २०२२ स्विझरलँडमध्ये एक जागतिक आर्थिक परिषद झाली. त्यात वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासोबत चर्चा झाली. त्यावेळी माझ्यासोबत आदित्य ठाकरे देखील होते. आम्ही सविस्तर माहिती, पायाभूत सुविधा राज्यात कशा आहेत, याबाबात अग्रवाल यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी आम्ही महाराष्ट्रात ही गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले होते, अशी माहिती देसाई यांनी दिली.

देसाई म्हणाले की, त्या परिषदेत अग्रवाल यांच्यासोबत चांगली सकारात्मक चर्चा झाली. केंद्र सरकारचा होकार आम्हाला घ्यावा लागेल, असे अग्रवाल म्हणाले होते. त्यावेळी आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, त्यावेळी गुजरातचा काहीही संबंध नव्हता, पण त्या प्रकल्पासाठी कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र तीन राज्यात स्पर्धा होती. हे तिन्ही राज्य या प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून काम करत होती. पुढे देसाई म्हणाले की, मागच्या दोन-अडीच वर्षांमध्ये गुजरातची कुठेही चर्चा नव्हती. आयटी क्षेत्रात कर्नाटक, तेलंगाना आणि महाराष्ट्र हे तीन राज्य आघाडीवर आहेत. गुजरात जवळपासही फिरकत नाही.

पुढे माहिती देताना देसाई म्हणाले की, २४ जून २०२२ ला मी एक शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन गेलो, तिथे आम्हाला फॉक्सकॉन कंपनीचे ताईवानवरून आलेले अधिकारी भेटले. त्या भेटीत तळेगावची चर्चा झाली. जमीन, पाणी किती स्वस्त मिळेल यावर चर्चा करण्यात आली. तुम्हाला आम्ही सर्व सुविधा द्यायला तयार आहोत, तुम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात आणा, यावर आम्ही त्यांना विनंती देखील केली.

हे ही वाचा:

मस्कत-कोची एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला आग; प्रवाशांना तातडीने काढले बाहेर

भारतीय महिला संघाने इंग्लंडचा उडवला धुवा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss