RBI माजी गव्हर्नर रघुराम राजन राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी

RBI माजी गव्हर्नर रघुराम राजन राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Former RBI Governor Raghuram Rajan) काँग्रेस (Congress) पक्षाच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी झाले होते. राजस्थानमधील सवाई माधोपूरच्या भदोती येथून आज (१४ डिसेंबर २०२२) सकाळी काँग्रेसच्या भारत जोडा यात्रेला सुरुवात झाली.या यात्रेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत रघुराम राजन (Raghuram Rajan) दिसत आहेत.

हेही वाचा : 

जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आर्थिक अडचणीत असताना, ‘या’ उद्द्योगपतीने मदतीचा केलेला हात पुढे

रघुराम राजन (Raghuram Rajan)) हे राहुल गांधी यांच्याबरोबर यात्रेत सहभागी झाल्याचा फोटो काँग्रेसने सोशल मीडीयावर व्हायरल केला आहे. द्वेषाच्या विरोधात देशाला एकत्र आणण्यासाठी लोकांची संख्या वाढत आहे. ही वाढती संख्या आपण यशस्वी होऊ हे दर्शवत असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. सध्या राहुल गांधा यांची भारत जोडो यात्रा ही राजस्थानमध्ये (Rajasthan) आली आहे. राजस्थानमधील भदौती इथे रघुराम राजन आज राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले होते.

रघुराम राजन यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सरकारच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांबद्दल अनेकदा कठोर शब्दात भूमिका स्पष्ट केली आहे. भारताचे भविष्य उदारमतवादी लोकशाही आणि संस्था मजबूत करण्यात आहे कारण आर्थिक विकास साधण्यासाठी ते आवश्यक आहे, असंही राजन यांनी याआधीच म्हटलं आहे.

Eysing PF40 Electric Bike महिंद्राने बनवली चक्क ‘६०’ किलोची इलेक्ट्रिक बाइक

नोटाबंदीसारख्या (Demonetization) निर्णयांवर सडकून टीका करणाऱ्या राजन यांनी देशातील आर्थिक मंदीसाठी मोदी सरकारच्या राजकीय आणि सामाजिक अजेंड्याला जबाबदार धरले. त्यामुळे त्यांना भाजपच्या तीव्र प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले आहे. रघुराम राजन यांनी भारत जोडो यात्रेत सामील होणे फारस आश्चर्यकारक नाही. त्याचं कारण म्हणजे, कॉंग्रेसकडून विविध क्षेत्रातील विविध विचारसरणीच्या लोकांना भारत जोडो यात्रेत सामील करून घेण्यासाठी प्रयत्न होत आहे. या यात्रेचे उद्दीष्टच मुळी देशाला एकत्र करणे आहे. माग ते कोणत्याही विचारधारेचे असो वा विचारसणीचे.

Exit mobile version