‘केंद्रातील चार मोठे प्रकल्प राज्यात….’, निर्मला सितारमन यांचा सवाल

नाणार सारखा प्रकल्प, जी आशियामधील सर्वात मोठी ऑईल रिफायनरी होणार होती, त्याला कोणी रोखलं? तसेच आरे मेट्रो कारशेडसारख्या प्रकल्प होऊ दिला नाही.

‘केंद्रातील चार मोठे प्रकल्प राज्यात….’, निर्मला सितारमन यांचा सवाल

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने महाराष्ट्रात विरोधकांकडून शिंदे – फडणवीस सरकारवर टीकांचा पाऊस पाडण्यात आला होता. पण केंद्रातील चार मोठे प्रकल्प राज्यात येऊ का दिले नाही? आघाडी सरकारच याला जबाबदार आहे, असा गंभीर आरोप करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन ( Nirmala Sitharaman ) यांनी शिवसेनेसह ( Uddhav Thackeray ) राष्ट्रवादी ( Sharad Pawar ) आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी तसेच विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप होत आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नाणारसारखा प्रकल्प, जी आशियामधील सर्वात मोठी ऑईल रिफायनरी होणार होती, त्याला कोणी रोखलं? तसेच आरे मेट्रो कारशेडसारख्या प्रकल्प होऊ दिला नाही. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प कोणी थांबवला? सर्वांना माहित आहे. हा प्रकल्प झाला असता तर याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाणार होतं म्हणून हा प्रकल्प थांबवण्यात आला आहे. राज्यातून एक प्रकल्प गेल्याने विरोधक आज इतका आरडाओरडा करत आहे. पण देशातील प्रमुख चार प्रकल्प कोणी थांबवले? याचे उत्तर महाविकास आघाडीने द्यावे. मगच आम्हाला प्रश्न विचारावा, असा टोला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांना लगावला आहे.

यावेळी बोलताना सितारामन म्हणाल्या, सहकार क्षेत्रात अनेकांनी आपली राजकीय पोळी शेकली. पण त्यापैकी कोणीही वेगळं मंत्रालय बनवण्यासाठी प्रयत्न केला नाही. सहकार क्षेत्रासाठी वेगळं मंत्रालय फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच बनवलं. त्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्र मजबूत होणार आहे. सहकार क्षेत्राचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

सध्या देशातील डॉलरच्या तुलनेत रुपयाची घट झाली असली तरी बाकीच्या देशाच्या चलनाच्या तुलनेत रुपयाने डॉलरच्या तुलनेत चांगली पकड घेतली आहे. अर्थमंत्रालय या गोष्टीवर लक्ष ठेवून असल्याचे निर्मला सितारामन यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी केले कार्यकर्त्यांना आवाहन म्हणाले, कुणी एक मारली तर तुम्ही…

मुकेश अंबानींनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; ‘वर्षा’ वर झाली तासभर चर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version