चार पोलिसांनी जोरात धक्का दिला, त्यामुळं मी खाली पडलो – नितीन राऊत

चार पोलिसांनी जोरात धक्का दिला, त्यामुळं मी खाली पडलो – नितीन राऊत

माजी मंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) हे भारत जोडो यात्रेस (Bharat Jodo Yatra) सहभागी होण्यासाठी हैदराबादला गेले होते. गर्दीत पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत नितीन राऊत जखमी झाले. त्यानंतर रुग्णालयात जाईपर्यंत त्यांना बरीच कसरत करावी लागली. त्याची आपबिती त्यांनी आज नागपूर विमानतळावर आल्यावर स्वतः सांगितली. नितीन राऊत म्हणाले, भारत जोडो यात्रा सुरू झाली. तेव्हापासून मी त्या यात्रेत सहभागी झालो नाही. मध्यंतरी मला बरं नव्हतं. पण, आता बरं वाटलं. म्हणून यात्रेत सहभागी होण्याचा बेत केला. हैदराबादेत भारत जोडो यात्रेत सहभागी व्हायला गेलो. विमानतळावर उतरल्यानंतर इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रम होता. तिथून पदयात्रा चारमीनार येथून जाऊन कार्यक्रम होणार होता.

ट्रॅफिक बंद असल्यानं पाच किलोमीटर चालत तिथं पोहचलो. स्टेजजवळ पोहचणार तेवढ्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा ताफा आला. तिथं प्रचंड गर्दी होती. पोलीस अस्वस्थ झाली. पोलीस लोकांवर तुटून पडले. पोलीस लोकांना बाजूला करायला लागले. मी कॉर्नरला होतो. स्वतः एसीपी त्याठिकाणी होते. चार पोलिसांनी जोरात धक्का दिला. त्यामुळं खाली पडलो. डोक्याला मार लागला.

“मी कोपऱ्यात होतो. तरी मला छातीवर हात ठेवून स्वत: एसीपी आणि चार लोकांनी जोरात धक्का दिला. समोरून ढकलल्यामुळे मला डोक्यावर लागणार असं वाटत असतानाच मी स्वत:ला सावरलं. त्या प्रयत्नात मी उजव्या बाजूला रस्त्यावर पडलो. मला डोळ्याला जोरात मार लागला. तिथे रक्तस्राव सुरू झाला. २२ मिनिटं रक्तस्राव सुरू होता. पण कुणीही आलं नाही. पोलीसही आले नाहीत. कार्यकर्त्यांनी घेराव घातला”, असा दावा राऊत यांनी केला. “अल्पसंख्य विभाग आणि अनुसूचित जाती विभागाच्या कार्यकर्त्यांनी मला सावरलं. थंड पाण्याची बाटली एकानं दिली. ते पाणी डोक्यावर टाकलं. तरी रक्तस्राव थांबला नाही. त्या ताफ्यातच एक अॅम्ब्युलन्स होती. त्यात मला प्राथमिक उपचार देण्यात आले. ते म्हणाले ‘रक्तस्राव थांबत नाही. तुम्ही तातडीने रुग्णालयात जा’. जवळपास दीड ते दोन किलोमीटर पायी गेल्यानंतर आम्ही चहाच्या एका टपरीवर ‘कुणाकडे गाडी आहे का?’अशी विचारणा केली. तेव्हा तो बाईक घेऊन आला. त्या बाईकवर ते मला रुग्णालयात घेऊन गेले. तिथे उपचार झाले”, असंही राऊत यांनी सांगितलं.

हे ही वाचा :

Andheri Election : अंधेरी पूर्व मतदारसंघात ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान, सात उमेदवार रिंगणात कोणाचा होणार विजय?

BJP : पंकजा मुंडेंना पुन्हा डावलत, चित्रा वाघ यांची महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version