‘काळम्मावाडी धरणाच्या गळतीसाठी निधी देण्यात येणार’, अजित पवार

कोल्हापूरमधील काळ्ळमावाडी धरणाला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल, असे आश्वासनही अजित पवारांनी यावेळी भाष्य करताना दिले.

‘काळम्मावाडी धरणाच्या गळतीसाठी निधी देण्यात येणार’, अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्या हस्ते काल कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला. तसेच अजित पवारांनी प्रलंबित असलेली कोल्हापूरची हद्दवाढ, आयुक्त नसल्याने बेवारस झालेली महापालिका आणि काळम्मावाडी धरणाच्या गळतीवर या गोष्टींवर भाष्य केले.

कोल्हापूरमधील काळ्ळमावाडी धरणाला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल, असे आश्वासनही अजित पवारांनी यावेळी भाष्य करताना दिले. दरम्यान यावेळी भाषण करताना अजित पवारांनी कोल्हापूर हद्दवाढीवर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच कोणत्याही जिल्ह्याचा किंवा शहराचा विचार केला तर पुढील 50 वर्षांचा विचार केला तर धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. तसेच कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया येत्या दोन तीन दिवसात पूर्ण होईल, असेही भाष्य करताना अजित पवारांनी सांगितले.

जिल्ह्याच्या काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी शंभर टक्के मदत करण्यात येईल. तसेच पाऊस संपताच या गळती काढण्याच्या कामास सुरवात करण्यात येणार आहे, असे आश्वासन अजित पवार यांनी भाष्य करताना दिले. तसेच ही गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपयांचा खर्च आहे. तर या कामासाठी चांगला ठेकेदार मिळाल्यानंतर ५० टक्के रक्कम तातडीने उपलब्ध करुन दिली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. २६ टीएमसीचे धरण असताना २१ टीएमसी पाणी साठवले जात आहे. ही धरण गळतीची समस्या अत्यंत गंभीर आहे. सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा झाली आहे. गळती दुर केल्यानंतर प्रत्येकवर्षी ५ टीएमसी पाणी वाढणार आहे. जिल्ह्यातील शेतीच्या तसेच पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता गळती थांबविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तसेच या विषयावर तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ‘कोल्हापूर शहराच्या विकासासाठी हद्दवाढ झालीच पाहिजे. दरम्यान हद्दवाढ झाल्यानंतर आपल्या शेत जमिनीवर आरक्षण पडतील अशी भिती काहींच्या मनात आहे. तसेच हद्दवाढ झाल्यानंतर मोठे रस्ते, भाजी मंडई, क्रीडांगण, शाळा आणि महाविद्यालय, दफनभूमी, स्मशानभूमी, हॉस्पिटल, महावितरणचे ट्रान्फॉर्मर यांसारख्या नागरी मुलभूत सुविधा द्याव्या लागणार आहेत. या सगळ्यासाठीच आरक्षण ठेवावे लागतील’, असे उपमुख्यमंत्रीव अजित पवार यांनी सांगितले.

हे ही वाचा:

बीडची जनता पवारांना सोडून गेलेल्यांचे निवडणुकीत डिपॉझिट जप्त करणार, राष्ट्रवादी

महाविकास आघाडीत संभ्रम नसल्याचं संजय राऊतांनीही स्पष्ट केलं, सुप्रिया सुळे

संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे त्यांच्या हयातीमध्ये भाजपसोबत हातमिळवणी करतील…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version