‘काय झाडी, काय हाटील…’ या विधाना नंतर आता सांगोला ‘गद्दार मटन थाळी’मुळे चर्चेत

‘काय झाडी, काय हाटील…’ या विधाना नंतर आता सांगोला ‘गद्दार मटन थाळी’मुळे चर्चेत

काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल… एकमदम ok… या एका डायलॉगमुळे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील रातोरात प्रसिद्ध झाले. त्यांचा हा डायलॉग तुफान फेमस झाला. नेटकऱ्यांनी तर या डायलॉगयला एक ट्रँड बनवून टाकला. इतकच नाहीतर विरोधक देखील त्यांच्या एकमदम ok या डायलॉगचा टीका करण्यासाठी वापर करत आहेत. एकमदम ok फेम शहाजीबापू यांच्या मतदारसंघात म्हणजेच सांगोला येथे सध्याच्या राजकीय वातावरणाचा फायदा घेत एका हॉटेल चालकाने चक्क आपल्या मटन थाळीला ‘गद्दार मटन थाळी’ असे नाव दिले आहे. आणि हा चांगला चर्चेचा विषय बनला आहे. ही थाळी चवीनं चांगली आहे कि नाही या बद्दल खात्री नाही, परंतु नावामुळे चांगलीच प्रसिद्ध होतेय.

हेही वाचा : 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात अजित पवारांनी धरलेल्या मौनाचे कारण आले समोर…

सांगोला जिल्ह्यातील शिरभावी गावात समाधान सलगर यांचे ‘कांचन रिसॉर्ट’ नावाचे हॉटेल आहे. ग्रामीण भागात हे हॉटेल असूनही आपल्या वेगळ्या थाळीमुळे कायमच प्रसिद्ध राहिले आहे. सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणाचा फायदा घेण्यासाठी हॉटेल चालक समाधान सलगर यांनी आपल्या एका मटण थाळीला चक्क ‘गद्दार मटन थाळी’ असे नाव दिले आहे. गणपती विसर्जनानंतर ही मटन थाळी सुरू केली असली तरी त्या अगोदरच त्यांनी दिलेल्या थाळीच्या नावांमुळे ही चांगलीच प्रसिद्ध झाली आहे.

कोकणसह महाराष्ट्रातील घाट परिसरात पुढील ५ सर्तकतेचे

याविषयी हॉटेल चालक यांनी म्हटले, गद्दार मटणथाळीला जरी नाव ‘गद्दार मटणथाळी’ असे दिले असलेतरी जेवण मात्र आपण गावरान व चांगल्या प्रकारे देणार आहोत. त्यात आपण गद्दारी करणार नाही. या नावाबाबत आपणास कोणताही हेतू नसून ही थाळी प्रसिद्ध व्हावी एवढीच अपेक्षा होती.” असे समाधान सलगर यांनी सांगितले.

MPSC विद्यार्थ्यांचा अनोखा प्रयोग, ‘ट्विटर जागृती मोहीम’ राबवणार

Exit mobile version