विधवा महिलांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ असा उल्लेख करावा, मंगलप्रभात लोढा यांच्या सचिवांना सूचना

राज्यामधील विधवा महिलांचा सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे यांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ असा उल्लेख करण्यात यावा असा प्रस्ताव करण्याची सूचना महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी विभागाच्या सचिवांना केली आहे.

विधवा महिलांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ असा उल्लेख करावा, मंगलप्रभात लोढा यांच्या सचिवांना सूचना

राज्यामधील विधवा महिलांचा सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे यांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ असा उल्लेख करण्यात यावा असा प्रस्ताव करण्याची सूचना महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी विभागाच्या सचिवांना केली आहे. मात्र असा उल्लेख केल्यास समाजामध्ये विधवा महिलांची ओळख जाहीर होईल असा आक्षेप महिला संघटनांनी घेतला आहे. समाजामधील अपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवासामध्ये आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्यातून समाजातील अपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याबरोबरच आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला जात आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अपंग ऐवजी दिव्यांगअसा शब्दप्रयोग केला आहे त्यामुळे दिव्यांग बांधवांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यात येऊन त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे. याच धर्तीवर राज्यामधील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवा ऐवजी गंगा भागिरथी हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा असा आदेश लोढा यांनी विभागाच्या पराधाब सचिवांना दिला आहे. महिला आयोगाकडून विधवा महिलांच्या नावाच्या विषयी काही सूचना आल्या होत्या.ज्या सूचना आल्या होत्या त्यांपैकी एक सूचना अशी होती की, महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी गंगाभारती हे नाव प्रचलित आहे. देशातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवा ऐवजी गंगा भागीरथी हा शब्द वापरण्याबाबतचा प्रस्ताव प्रधान सचिवांकडे पाठवला आहे. सध्या हा प्रस्ताव मंगलप्रभात लोढा यामी पाठवला आहे. या प्रस्तावावर चर्चा झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही असे सांगण्यात आले. विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी हा प्रस्ताव पाठवल्याचे मंगलप्रसाद लोढा म्हणाले.

मंगलप्रभात लोढा हे वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. मला आश्चर्य वाटत आहे आणि मी त्यांच्याशी मी फोनवरुन संपर्क करणार आहे. यामध्ये खरंच वेगळेपण करण्याची ऑर्डर काढून करण्याची गरज आहे का? श्रीमती हा शब्द वापरला जातो आणि तुम्ही त्यांना प्रेमाने काहीही म्हणू शकता परंतु सरकारने ऑर्डर काढून नावापुढे काहीतरी लावणे म्हणजेच त्यांना वेगळे करणे आहे. विधवा हा शब्द कटू वाटतो त्यावर चर्चा होऊ शकते. एखाद्या पुरुषाची बायको जेव्हा जाते तेव्हा तुम्ही काही लावता का? तुम्ही समतेची भाषा करता हा महिलांवर अन्याय नाही का? असा प्रश्न सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे.

हे ही वाचा : 

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, महाविकास आघाडीचे मतभेद समोर येऊ लागल्याने ठाकरे पवारांची महत्त्वपूर्ण बैठक?

‘लोकजागर’च्या माध्यमातून रसिकांसमोर उभा राहिला अवघा महाराष्ट्र, ठाणेकर रसिकांचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version