‘… बदला घेण्यासाठी सज्ज व्हा’, शिवसेनेचा नवा नारा

मुंबई महानगरपालिकेवर (BMC Elections) आपलं वर्चस्व पुन्हा एकदा राखण्यासाठी शिवसेना जोरदार तयारीला लागली आहे. यासाठी वेगवेगळ्या योजनांचा वापर देखील त्यांच्याकडून वारंवार पाहायला मिळत आहे.

‘… बदला घेण्यासाठी सज्ज व्हा’, शिवसेनेचा नवा नारा

मुंबई महानगरपालिकेवर (BMC Elections) आपलं वर्चस्व पुन्हा एकदा राखण्यासाठी शिवसेना जोरदार तयारीला लागली आहे. यासाठी वेगवेगळ्या योजनांचा वापर देखील त्यांच्याकडून वारंवार पाहायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने टॅगलाईनवर मोठ्या प्रमाणात पक्षाचं लक्ष असल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे. ‘बदल सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा’, असा शिवसेनेचा नवा नारा असणार आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही फार प्रतिष्ठेची असणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला पुन्हा संधी मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष आहे. निवडणूक प्रचारात सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. बदलत्या प्रचारतंत्राचा वापर करत ‘टॅगलाइन’च्या माध्यमातून आपली ओळख ठसवण्याचा प्रयत्न करताना पक्ष दिसतात. मोजक्या शब्दांत मोठा अर्थ साधणाऱ्या ‘टॅगलाइन’ मतदारांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यामुळे या ‘टॅगलाइन’च्या माध्यमातून प्रतिस्पर्ध्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यातच आता आगामी निवडणूकांसाठी सगळेच पक्ष अशा टॅगलाईन बनवण्यामध्ये व्यस्त आहेत.

शिवसेनेच्या गटप्रमुखांसाठी आयोजित मेळाव्यासाठी आज नेस्को मैदानात भव्य तयारी करण्यात आली आहे. यासाठी मोठया प्रमाणत फ्लेक्स बाजी देखील करण्यात आली आहे. यावेळी एक फ्लेक्सची प्रचंड चर्चा सभास्थळी पाहिला मिळाली. शिवसेनेने या आधी देखील टॅग लाईनच्या माध्यमातून विरोधकांना जेरीस आणल्याच पाहिला मिळालं आहे. नुकतेच 40 बंडखोर आमदारांना पन्नास खोके एकदम ओक्के, गद्दारांना माफी नाही अशा आशयाच्या घोषणा आणि फ्लेक्स पाहिला मिळाले होते.

शिवसेनेने त्यांच्या टॅगलाईनवर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे हे दिसून येत आहेत.
माझं कुटुंब माझी जबाबदारी, पुढे चला मुंबई, पन्नास खोके एकदम ओके, स्वतःला खोके महाराष्ट्राला धोके, महाराष्ट्राच्या विकासाचा मी शिलेदार आता येतय माझं सरकारं, मुंबई में जेलेबी ने फाफडा उद्धव ठाकरे आपडा… अश्या प्रकारच्या अनेक टॅग लाईन शिवसेनेकडून वापरल्या जात आहेत. आत्तापर्यंत शिवसेनेचा इतिहास पाहता सेनेने कायम टॅग लाईनची मदत आपल्या प्रचारासाठी आणि विरोधकांवर टिकेसाठी घेतली आहे. मागील महापालिका निवडणुकीत ‘करून दाखवलं’ ही टॅग लाईन तर आता आगामी पालिका निवडणुकीत ‘बदल सोडाच गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा’ ही टॅगलाईन घेऊन सेना निवडणुकीला सामोरे जाताना पाहिला मिळतं आहे.

हे ही वाचा:

AirAsia देणार मोफत तिकिटं, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत करता येणार प्रवास; जाणून घ्या कशी करायची तिकीट बुक…

Apple iPhone 14 Pro Max फोनमध्ये आढळल्या त्रुटी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version