Sunday, July 7, 2024

Latest Posts

‘जो तो राजकीय पोळी भाजत आहे’ मंत्री Girish Mahajan यांची घणाघाती टीका

आज सकाळी भाजप (BJP) मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. सुरवात लवकरच येणाऱ्या आषाढी वारीने केली.

आज सकाळी भाजप (BJP) मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. सुरवात लवकरच येणाऱ्या आषाढी वारीने केली. १७ जुलैला पार पडणाऱ्या या आषाढी वारी बद्दल बोलताना गिरीश महाजन म्हणाले, ’17 जुलैला पंढपूरच्या आषाढीची वारी आहे. मोठ्या संख्येने वारकरी त्या ठिकाणी येतील. निर्मल वारी स्वच्छता वारी व्हावी यासाठी सूचना दिल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी पालखी जाईल तेथे व्यवस्था करण्यात येणार आहेत. शासनाकडून ५० कोटींचा निधी दिला आहे. मोबाईल टॉयलेट, हिरकणी कक्ष वाढवले आहेत. कुठे ही अस्वच्छता राहू नये यासाठी प्रयत्न आहेत. यंदाची वारी सुंदर व्हावी अशी अपेक्षा आहे. पावसाने चांगली सुरुवात केली आहे. वारकऱ्यांसाठी पाण्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. २० हजार रुपये अनुदान देणे ही चांगला उपक्रम आहे. काहींनी विरोध केला हे ऐकले आहे. वारकऱ्यांना समस्या होऊ नये म्हणून हा उपक्रम आहे. हा वारकऱ्यांचा उत्सव आहे, यात राजकारण करु नये ही विनंती आहे, सरकारचा हेतू स्वच्छ आहे. गेल्या वर्षी काही चुका झाल्या असतील तर यावेळेस होणार नाही याच्या सूचना देऊ’.

ओबीसी (OBC) आंदोलन विषयी भाष्य करताना महाजन म्हणाले, ‘सरकारने ओबीसी समाजाची दखल घेतली नाही असे नाही. अनेक मंत्री तिथे जाऊन आले आहेत, मी पणं त्या ठिकाणी जाणार आहे. आम्ही दखल घेतली आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, ‘जो तो राजकीय पोळी भाजत आहे. आम्हाला ही आरोप करता येईल पण आम्ही ते करणार नाही. राजकीय पोळी भाजण्यासाठी अस करू नये, कुणी कुणाला उभे केले नाही

आरक्षण मुद्दा घेऊन गिरीश महाजन म्हणाले, ‘शासनाने जे जे करणे शक्य आहे ते केलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) होते शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते आरक्षण कशाला ?आमची भूमिका स्पष्ट आहे की १० टक्के आम्ही परित केले आहे. कुठे ही ओबीसीला धक्का न लावता आरक्षण दिले आहे, काही लोक राजकीय पोळ्या भाजत आहे. मतदारांचा कौल आहे तो आम्हाला मान्य आहे आम्ही कुणाला ही वाऱ्यावर सोडलेले नाही, आम्हीच आरक्षण दिलेले.’

हे ही वाचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss