संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद देणं हे अत्यंत दुदैवी, चित्रा वाघ संतापल्या

Maharashtra Cabinet Expansion - गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज झाला आहे.

संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद देणं हे अत्यंत दुदैवी, चित्रा वाघ संतापल्या

मुंबई :- Maharashtra Cabinet Expansion – गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज झाला आहे. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात शिंदे गटाचे ९ आणि भाजपचे ९ अश्या एकूण १८ आमदारांनी आज शपथ घेतली आहे. या मंत्री मंडळात एकाही महिलेले स्थान हे देण्यात आले नाही. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी, दोन महिला नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, उलट घडले असल्याचे पाहायला मिळाले. भाजपकडून पंकजा मुंडे आणि माधुरी मिसाळ या दोघींची नावे चर्चेत होती. पण, दोघींनाही कॅबिनेट मंत्रीपदी स्थान दिले नसल्याचे समोर आले आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना डावलण्यात आले आहे. तर दुसरीकडे या १८ आमदारांमध्ये शिंदे गटाचे संजय राठोड यांनी देखील शपथ हि घेतली आहे.

संजय राठोडांच्या शपथविधीनंतर भाजपच्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर तिला केली आहे. त्यांनी टीका करत पूजा चव्हाण प्रकरणातील माझा त्यांच्याविरूद्धचा लढा चालूच राहील असं सांगितलं आहे. पूजा सावंत हिच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे” असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

तर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी देखील महिलांना एक हि पद मिळाले नाही या बाबत ट्विटर मार्फत खंत व्यक्त केली आहे. त्या ट्विट मध्ये त्या म्हणाल्या, पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे. तर महिलांना एकही पद मिळाले नाही याबाबत सर्व ठिकाणी खंत व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे भाजपच्या पंकजा मुंडे यांनी सोशल मीडिया मार्फत सर्व मंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.

हे ही वाचा :-

Maharashtra Cabinet Expansion : आज एकूण 18 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची घेतली शपथ  

Exit mobile version