spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘… योग्य निर्णय घेण्यासाठी संजय शिरसाट यांना देव सद्बुध्दी देवो’ – सुषमा अंधारे

शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याचा दावा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला होता. सुषमा अंधारे यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याचा दावा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला होता. सुषमा अंधारे यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, अंधारे यांचा हा दावा स्वत: संजय शिरसाट यांनी फेटाळून लावला आहे. मी कुणाच्याही संपर्कात नाही. मी शिंदे गटातच आहे, असं शिरसाट म्हणाले. मात्र, शिरसाट यांच्या या विधानानंतरही सुषमा अंधारे या आपल्या मतावर ठाम आहेत. शिरसाट कधीही परत फिरू शकतात, असा दावा सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

“मी खरंच देवासाठी प्रार्थना करेल की, योग्य निर्णय घेण्यासाठी संजय शिरसाट यांना देव सद्बुध्दी देवो, असंही अंधारे म्हणाल्या आहेत. तसेच दीपक केसरकरांना खरंच गंभीरता कळत नाहीये, पण संजय शिरसाट यांच्यावर जो अन्याय झाला आहे, त्यामुळे ते कधीही शिवसेनेत येवू शकतात.”, असा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी केला आहे.

“विष ओकणारे उद्धव ठाकरे गटात येत आहे. मग उद्या उद्धव ठाकरे हे ओवैसींची भेट घेतली का? असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक तुषार भोसले यांनी केलं आहे. या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. असली माणसं जी आहेत ना, ती भाजपनं फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी सुपारी बाज पद्धतीनं ठेवली आहेत. अशा माणसांना मी महत्व देत नाही आणि त्यांच्या टीकेला उत्तरही देत नाही, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे.

“आता त्यांची अडचण अशी आहे की, त्यांना बोलता येत नाहीये. गुवाहाटीला गेल्यावर शिंदे गटाची भूमिका मांडणारे पहिले आमदार जर कोण होते, तर ते संजय शिरसाट. पण, संभाजीनगरमध्ये आता अतुल सावे असतील, संदिपाल भूमरे किंवा अब्दुल सत्तार असतील यांना ज्या पद्धतीने अधिकार आणि फुलफ्लेज स्कोप दिला जात आहे, त्यामुळे संजय शिरसाट यांची कुचंबणा होत आहे. पण तरीही बोलताना संजय शिरसाट हसताना दिसून येत आहे. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो…”, असं म्हणत अंधारे यांनी टोला लगावला आहे.

शरद कोळी यांना जिल्हा बंदी केल्यानंतर पोलिसांनी चोपडा येथील सभेला येत असताना तीन ठिकाणी माझी गाडी तपासली. गाडीमध्ये खरंच शरद कोळी बसले आहेत का? याची चौकशी केली, अशी माहितीही सुषमा अंधारे यांनी दिली आहे. पण आम्ही कायद्याचं पालन करतो. त्यानुसार शरद कोळी यांना जिल्ह्याबाहेर सोडेपर्यंत सोबत होतो, असंही त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा :

बारामतीत शरद पवारांना धक्का, सोमेश्वर कॉलेजला पवारांचे नाव दिल्याने शेतकरी कृती समितीचा आक्षेप

संतोष बांगर यांच्या अडचणीत पुन्हा वाढ; मंत्रालयातील पोलिसांना शिवीगाळ ?

शिंदे पुत्र Vs ठाकरे पुत्र! आता सामना रंगणार वारसदारांमध्ये; मतदारसंघ एक तर सभा दोन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss