कर्नाटक मधील स्त्रियांसाठी खुशखबर, सिद्धरामय्या सरकारने केले वचन पूर्ण!

कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने महिलांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारद्वारे ११ जून रोजी नवीन नियम लागू करण्यात आला आहे.

कर्नाटक मधील स्त्रियांसाठी खुशखबर, सिद्धरामय्या सरकारने केले वचन पूर्ण!

गेल्या काही महिन्यापूर्वीच कर्नाटक निवडणुकींचा निकाल लागला. बीजेपी या निवडणुकांमध्ये बाजी मारणार अशी सर्वांचीच अपेक्षा होती. या साठी बीजेपी ने अनेक खेळी सुद्धा खेळल्या परंतु शेवटच्या टप्प्यात कॉंग्रेस ने प्रचंड बहुमत मिळवून बाजी मारली.आणि सिद्धरामय्या यांनी कर्नाटक मध्ये आपले सरकार स्थापन केले. या निवडणुकीच्या काळात सिद्धरामय्या यांनी शपथ घेताना अनेक आश्वासने दिले होते. त्या पैकी एका आश्वासनाची पूर्तता आज कॉंग्रेस सरकार द्वारे सिद्धरामय्या यांनी पूर्तता केली आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने पाच आश्वासनांपैकी एका आश्वासनाची पूर्तता केली आहे. एसी आणि व्होल्वो या बस वगळता माहीलांना अन्य सर्व सरकारी बस मध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. यामध्ये एक्स्प्रेस बस सेवांचाही समावेश आहे.परंतु तिरुपती देवदर्शनासाठी जाताना बससेवा मोफत नसेल तिरुपतीला जाताना महिला कोलार जिल्हा आंध्रप्रदेश सीमेपर्यंत फक्त मोफत प्रवास करु शकतात. त्या पुढे महिलांना प्रवासाचे शुल्क आकरण्यात येतील.
आज पासून कर्नाटक सरकारद्वारे कर्नाटकात शक्ती योजना लागू करण्याचे आदेश जाहीर झाले आहेत. या योजने अंतर्गत आज पासून महिला मोफत बसप्रवास करू शकतील. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार आज पासूनच कर्नाटकात शक्ती योजना लागू होणार असून, सरकारी बसमधून महिलांना मोफत बस प्रवास करता येणार आहे.

कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने महिलांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारद्वारे ११ जून रोजी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. या नवीन नियमा अंतर्गत महिलांना सरकारी बस मध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. महिला राज्या अंतर्गत २० किमीपर्यंतचा प्रवास सरकारी बस मधून करू शकतात. महाराष्ट्रा मध्ये सुद्धा महिलांना अर्ध्या किमतीत बस सेवा करण्याची मुभा आहे. आश्वासनात महिलांसाठी काही विशेष सवलती मांडल्या गेल्या या मध्ये महिलांसाठी मोफत बस प्रवास, मोफत वीज यास यासह आणखी पाच सेवांचा समावेश होता. सिद्धरामय्या यांनी त्याचं सरकार येताच प्रसिद्धपत्रात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी खूप आधीच सांगितले होते की, मोफत बससेवे अंतर्गत महिलांना फक्त २० किमी पर्यंतच प्रवास करता येणार आहे. शक्ती योजनेअंतर्गत माहीलांसोबत तृतीयपंथी यांना सुद्धा मोफत बस सेवेचा लाभ घेता येणार आहे.

हे ही वाचा:

दोन दिग्गज अभिनेते Amitabh Bachchan आणि Rajinikanth झळकणार एकाच चित्रपटात

माध्यमांशी बोलताना सुप्रिया ताईंनी दिले विरोधकांना सडेतोड उत्तर

दोन दिग्गज अभिनेते Amitabh Bachchan आणि Rajinikanth झळकणार एकाच चित्रपटात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version