गोपीचंद पाडळकरांचा अजित पवारांवर हल्लाबोल

गोपीचंद पाडळकरांचा अजित पवारांवर हल्लाबोल

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांमध्ये आणि विरोधकांमध्ये रोज आरोप प्रतिआरोप दिसून येत आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा वाद नवा नाही. आज पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रस (Nationalist Congress) पक्ष नसून ती एक टोळी असल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले “राष्ट्रवादीच्या स्थापने पासून पक्षाला एकच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आज पर्यंत ते बदलले नाहीत.

राष्ट्रवादीला कोणत्याही प्रकारचा अजेंडा नाही. मुळात राष्ट्रवादी हा पक्ष नसून एक टोळी आहे. हा पक्ष फुटणार नाही, तर आज ना उद्या संपेल. असा टोला लगावला. तर अजित पवार यांनी बारामती मतदार संघातील दुष्काळी गावांकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. अजित पवार यांना बारामतीमधील लोक लाखाच्या फरकानं निवडून देतात. त्यामुळेच बारामती मधील ४४ गावं आजही पाण्यासाठी वणवण भटकतात. गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत केवळ स्थापनेपासून एकच राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि तो आजपर्यंत बदलला गेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कोणत्याही प्रकारचा अजेंडा देखील नाही. हा पक्ष फुटणार नाही कारण तो आज ना उद्या संपणार आहे अशा शब्दात पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर (NCP) निशाणा साधला.

पडळकर यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले अजित पवार सांगतात आपण लाखाच्या मताने बारामती मधून निवडून येतो. जर तुम्ही लाखांच्या मताने निवडून येत असाल तर बारामती तालुक्यातील ४४ गाव हे पाण्यापासून वंचित का आहेत ? असा सवाल पडळकरांनी केला आहे.दुष्काळ सुरू झाला की महाराष्ट्रातून (maharashtra) या गावांची पाण्याची टँकर देण्याची पहिली मागणी असते याचा आधी विचार अजित पवारांनी केला पाहिजे. महाराष्ट्रात काय चाललंय त्यापेक्षा आपल्या मतदारसंघात काय चाललंय हे त्यांनी बघावं असा टोलाही आमदार पडळकर यांनी अजित पवारांना लगावला आहे.

हे ही वाचा:

प्रित्झकर आर्किटेक्चर पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय बाळकृष्ण दोशी यांचे निधन, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

Kangana Ranaut ती परत आली आहे, कंगनाने केले ट्विटरवर आगमन, ट्विट करून म्हणाली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version