जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटवर गोपीचं पडळकरांचा पवारांना टोला, घाणेरडं राजकारण करणं ही पवारांची कूट नीती ….

जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटवर गोपीचं पडळकरांचा पवारांना टोला, घाणेरडं राजकारण करणं ही पवारांची कूट नीती ….

काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आक्षेपार्ह्य ट्विट केले होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटरवर छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यावर विधान केले आहे. आता राजकीय वर्तुळातून याच्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या विरोधात अनेक हिंदू संघटनांनी आंदोलन केली. त्याच बरोबर भाजपा कार्यकर्ते आंदोलन करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवरच आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी जितेंद्र आव्हाडांच्या या विधानाचा आधार घेत थेट राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांवरच ( Sharad Pawar) निशाणा साधला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या एका भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजंववरील ट्विटचा उल्लेख करत त्यामागे शरद पवार यांचे राजकारण आहे. असा उल्लख केला आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले की “जितेंद्र आव्हाडांना कदाचित हे माहीत नाही, की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा जितुद्दीन झाला असता. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर अजितचा अझरुद्दीन झाला असता, शरदचा शमशुद्दीन झाला असता, रोहितचा रज्जाक झाला असता. परंतु मतांच्या राजकारणासाठी घाणेरडं विधान करणं, घाणेरडं राजकारण करणं ही पवारांची मागील ५० वर्षांतील कूट नीती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या हिंदू लोकांनी हे सगळे विषय समजून घेतले पाहिजेत. मतांसाठी किती खालच्या पातळीवर जावं, हे पवारांकडून कशापद्धतीने मतासाठी राजकारण केलं जातय हे महाराष्ट्रातील लोकांनी बघितलेलं आहे आणि आजही बघत आहेत, निश्चितपणे लोक त्यांना योग्य उत्तर देतील.” असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेंसार्वा शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल केला आहे.

तर जितेंद्र आव्हात यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यामधून असे ट्विट केल की प्रभु राम, रावण, छत्रपती शिवाजी महाराज, मुघल, आदिलशाही अशा सर्वांचा उल्लेख केला आहे. “रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण-अर्जुन समजावून सांगा. आदिलशाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वातंत्र्यलढा समजावून सांगा,” असे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हंटले आहे.

 

हे ही वाचा : 

Kasba By Poll Election, पोट निवडणुकीच्या रॅलीत गैरहजर राहून टिळक कुटुंबीयांनीची भाजपवर दर्शवली नाराजी

Patanjali Share, गौतम अदानींच्या पाठोपाठ आता रामदेव बाबांना देखील मोठा झटका!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version