गोपीचंद पडळकरांनी पदवीधर मतदानावर केली भीती व्यक्त

गोपीचंद पडळकरांनी पदवीधर मतदानावर केली भीती व्यक्त

सध्या महाराष्ट्रामध्ये पदवीधर निवडणुकीची (Graduate Constituency Election) धावपळ मोठ्या प्रमाणत दिसून येत आहे. तर येत्या ३० जानेवारीला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पण याच दिवशी विविध गटातील पदवीधरांच्या परीक्षा होणार असल्याचं समजत आहे. एकाच दिवशी पदवीधरांच्या परीक्षा आणि निवडणूक आल्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. यामुळं तब्बल एक दोन नाही तर १० हजार पदवीधरांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतले जाणार आहे. याच संदर्भात भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला (Maharashtra State Election Commission) पत्र पाठवले आहे. या गंभीर मुद्द्याची दखल घेऊन, यावर सकारात्मक तोडगा काढावा अशी विनंती सुद्धा पत्राद्वारे (letter) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे.

नाशिक (Nashik), अमरावती (Amravati), नागपूर (Nagpur), औरंगाबाद (Aurangabad) पदवीधर मतदारसंघासाठी (Graduate constituencies) आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका होत आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघात एका जागेसाठी उमेदवार रिंगणात आहेत. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात (Amravati Divisional Commissioner Offices) उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. यात एकूण ३४ उमेदवारांपैकी एकूण ३३ उमेदवारांची उमेदवारी अर्ज वैध ठरले. गजानन नेहारे या एका उमेदवाराचे वय ३० पेक्षा कमी असल्याने त्यांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले. १६ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

गोपीचंद पडळकर यांनी लिहिलेलं पत्र

प्रति,

निवडणूक आयोग, महाराष्ट्र.

जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख आहे. या लोकशाहीत निवडणूका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अशा परिस्थितीत कोण्याही व्यक्ती अथवा वर्गाला मतदानापासून वंचित रहावे लागणे त्याच्यावर अन्याय होण्यासारखे आहे.

भारत हा युवकांचा देश आहे. या पदवीधर युवकांच्या भवितव्याची दिशा ठरवण्याचं काम ‘पदवीधर’ आमदार करतात. मात्र तब्बल 10 हजार पदवीधरांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाणार आहे. या गंभीर मुद्द्याकडे आपले लक्ष वेधण्यासाठी हे पत्र मी लिहीत आहे.

येत्या 30 जानेवारीला पदवीधर मतदार संघाच्या निवडणूका आहेत. याच दिवशी नगरविकास, विधी व न्याय , वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये , सार्वजनिक आरोग्य या विभागांच्या गट ‘अ’ आणि ‘ब’ साठी विविध विभागांच्या परिक्षा होणार आहेत.

राज्यातील विविध ठिकाणी परिक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. शिवाय त्या दिवशी दोन सत्रात या परिक्षा पार पडणार आहेत. या सर्व कारणांमुळे तब्बल 10 हजारांहून अधिक उमेदवार ‘पदवीधर’ आमदार निवडणूकीच्या मतदानापासून वंचित राहणार आहेत.

लोकशाहीला अधिक बळकटी देण्याचं काम निवडणूका करत असतात. पदवीधरांच्या परिक्षा आणि निवडणूका एकाच दिवशी आल्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. निवडणूकांवर आणि पदवीधरांच्या भवितव्यावर याचा परिणाम होऊ शकतो. अशा या गंभीर मुद्द्याची दखल आपण घ्याल, यावर आपण सकारात्मक तोडगा काढाल अशी अपेक्षा माझ्यासह 10 हजार पदवीधर मतदारांना आहे.

आपलाच,
आ. गोपीचंद पडळकर

हे ही वाचा:

Makar Sankranti 2023, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव आणि शनी देवांची विशेष कृपा, पूजेच्या विधी घ्या जाणून

Nepal Aircraft Crash, ७२ जणांसह नेपाळचे विमान धावपट्टीवर कोसळले, बचाव कार्य सुरू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version