spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; नाना पटोलेंची मागणी हास्यास्पद-एकनाथ शिंदे

काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांन मध्ये रोज आरोप प्रत्यारोप सुरु आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार बरखास्त करण्याची मागणी केली जाणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी असल्याचे सामोर येत आहे. राज्यातील ईडी सरकार शेतकरीविरोधी आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचं त्यांनी पाटोले यांनी म्हटलंय. आम्ही लवकरच राज्यपालांकडे ही भूमिका मांडणार आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी या ईडीच्या भाजपच्या सरकारने घेतली पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही राज्यपालांकडे जाणार आहोत, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागलेलं असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.

अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. “परतीच्या पावसाच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करायला सांगितले आहेत. ते निकषात बसोत अथवा न बसोत, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. हे बळीराजाचं सरकार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं आहे. एनडीआरएफच्या नियमापेक्षा कितीतरी पटीने जास्तीची नुकसानभरपाई आपण दिलेली आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“हे भाष्य हास्यास्पद आहे. कारण आज राज्यात मोठं बहुमत असलेलं भक्कम पाठिंब्याचं सरकार स्थापन झालं आहे. तीन महिन्यांत आम्ही ७२ मोठे निर्णय घेतले आहेत. राज्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा ३९७ जागा मिळवून क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. आमच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटाला २४३ जागा मिळाल्या आहेत. इतरही येऊन भेटत आहेत. या यशामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. विरोधी पक्ष बोलतच असतो. विरोधी पक्ष टीका करत आहेत. पण त्यांच्या टीकेला आम्ही कामाने उत्तर देऊ”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा :

Whatsapp news : व्हॉट्सअॅप डाऊन, सेवांमध्ये व्यत्यय येत असल्याची वापरकर्त्यांची तक्रार

दिवाळीच्या दिवशी जया बच्चन का भडकल्या? घराबाहेरील फोटोग्राफर्सचा केला पाठलाग, पहा हा व्हिडिओ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss