spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यपाल आणि वाद, भगतसिंह कोश्यारींनी केलेली वादग्रस्त विधान कोणती घ्या जाणून

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत असतात. तसेच समोर आलेल्या माहितीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे लवकरच त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. नुकतच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वतीने राज्यपाल जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे आणि तशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे बोलून दाखवली असल्याचे एक निवेदन माध्यमांना पाठविण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मुंबई भेटीदरम्यान हि इच्छा व्यक्त केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पण यावर अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यपालांच्या पदमूक्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. कारण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या आधी अनेक वेळा महाराष्ट्रातील महापुरुषांचा , तसेच मराठी माणसाचा अपमान होईल असे वक्तव्य केले आहे.

राज्यातील विरोधी पक्षात असणाऱ्या अनेक नेत्यांनी राज्यपालांच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे आणि राज्यपालांचा हा योग्य निर्णय असल्याचेही सांगितले आहे. कारण राज्यपाल भगतसिंह (Bhagat Singh Koshyari) कोश्यारी यांनी त्यांच्या भाषणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) ,सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), संत रामदास स्वामी (Samarth Ramdas), या महापुरुषांचा अपमान केला आहे. तर राज्यपाल भागात सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मंदिरे खुली करण्यासंदर्भात सुद्धा वादग्रस्त वक्तव्य केल आहे. राज्यपालांनी एक भाषणात गुजराती आणि मराठी माणसांमध्ये तुलना केली होती. त्यामुळे ते चांगलेच वादात अडकले होते.

मराठी माणसाचा केला अपमान –

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे मुंबईत एक कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्राची आणि संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी मुंबईसंदर्भात वक्तव्य केल होत. तेव्हा “मुंबईतून गुजराती लोकांना काढा आणि राजस्थानी लोकांना काढा त्यानंतर तुमच्या इथे मुंबईत पैसे शिल्लक राहणार नाहीत. आणि मुंबईची आर्थिक राजधानी ही ओळख राहणार नाही. “असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केलं होत.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा अपमान –

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी एकदा छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि संत रामदास स्वामी (Samarth Ramdas) यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होत. तेव्हा राज्यपाल म्हणाले होते की “या देशात ज्याला गुरु मिळेल त्याला सर्वकाही मिळेल, समर्थांशिवाय शिवरायांना कोण विचारेल” असे वादग्रस्त वक्तव्य करत राज्यपालांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला होता.

सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्याबद्दल आक्षेपार्ह्य वक्तव्य –

राज्यपालांनी त्यांच्या एका भाषणात हसत हसत वक्तव्य केलं होत की “सावित्रीबाईंचं (Savitribai Phule) लग्न हे त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी झाल होता. त्यावेळेस त्यांचे पती ज्योतिबा फुले हे अवघ्या तेरा वर्षाचे होते, तर लग्न झाल्यावर या वयातील मुलं पुढे काय करतात”, असा सवाल राज्यपालांनी केला होता. त्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

हे ही वाचा:

आशिष शेलारांनी केले गंभीर आरोप, उद्धव ठाकरे यांनी इतके वर्ष शेठजी असल्याप्रमाणे…

विधानभवनात मान्यवरांसमोर नारायण राणेंनी आणि नीलम गोऱ्हें यांच्यात वाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss