Governor Bhagat Singh Koshyari, कोण आहेत भगतसिंग कोश्यारी ?

भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा जन्म उत्तराखंडत (Uttarakhand) १७ जून १९४२ रोजी झाला. उत्तराखंड हे स्वातंत्र्याआधी उत्तरप्रदेशातील राज्य होते. त्यामुळे कोश्यारींचे बालपण व शिक्षण हे उत्तर प्रदेशात झाले. अलमोडा कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी विषयात एमएचं शिक्षण घेतलं.

Governor Bhagat Singh Koshyari, कोण आहेत भगतसिंग कोश्यारी ?

भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा जन्म उत्तराखंडत (Uttarakhand) १७ जून १९४२ रोजी झाला. उत्तराखंड हे स्वातंत्र्याआधी उत्तरप्रदेशातील राज्य होते. त्यामुळे कोश्यारींचे बालपण व शिक्षण हे उत्तर प्रदेशात झाले. अलमोडा कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी विषयात एमएचं शिक्षण घेतलं. लहानपणापासूनच त्यांना राजकारणाची खूप आवड होती. ते त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना १९६१-६२ या काळात ते अलमोडा कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेत कार्यरत होते. पत्रकारितेमध्ये ही त्यांचे योगदान आहे, त्यामुळे पेशाने शिक्षक आणि पत्रकार असलेल्या कोश्यारींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून सामाजिक कामास सुरुवात केली होती . त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात आले.ते भारतामधल्या उत्तराखंड राज्याच्या राजकारणातील एक प्रमुख लोकनेते होते. उत्तराखंडमधील भारतीय जनता पक्षाचे सदस्य ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे.
कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय राहिले होते पुढे त्यांच्या सामाजिक कार्यकारी जीवनाची सुरूवात संघातूनच झाली.

इंग्रजी या विषयात पद्युत्तर असलेल्या कोशयारीनी उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील राजा इंटर कॉलेजमध्ये काही वर्षे व्याख्याते (लेक्चरर) होते. भगत सिह कोश्यारी यांनी १९७५ पासून प्रकाशित झालेल्या ‘पर्वत पियुष’ या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी लेखही लिहिले आहेत. राजकारण नंतर पत्रकारिता हा हि त्यांचा वाडीचा विषय होता. ‘उत्तरांचल प्रदेश क्यों?’ आणि ‘उत्तरांचल संघर्ष एवंम समाधान’ ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. आणीबाणी विरुद्ध आवाज उठवणारे भगतसिंग कोश्यारी होते, त्यासाठी ते ३ जुलै १९७५ ते 23 मार्च १९७७ असे तीन वर्षे ते तुरुंगात होते.

उत्तराखंडातील शिक्षण क्षेत्रात त्यांचा हातभार आहे त्यांनी उत्तराखंडमधील पिठोरागड येथील ‘सरस्वती शिशू मंदिर’, ‘विवेकानंद विद्या मंदिर इंटर कॉलेज’ आणि ‘नैनिताल येथील सरस्वती विहार उच्च माध्यमिक शाळा’ या संस्थांचीही स्थापना केली. त्यानंतर उत्तर प्रदेशपासून २००० साली वेगळा झालेल्या उत्तराखंड राज्यातील भाजपची धुरा कोश्यारींच्या हाती देण्यात आली. ते उत्तराखंडचे पहिले भाजप प्रदेशाध्यक्ष झाले होते. त्यानंतर पुढे जाऊन उत्तराखंड राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांना मिळाला.भारतीय जनता पक्षाचे सदस्य ते महाराष्ट्राचे राज्यपाल असा त्यांचा प्रवास राजकारणात पाहायला मिळाली. भगतसिंग कोश्यारी याना बालपणापासूनच राजकारणाची आवड होती. ट्रेकिंग करायला ,तत्त्वज्ञान, इतिहास आणि शिक्षण या विषयांची पुस्तकं त्यांना वाचायला खूप आवडतात.भगत सिह कोश्यारी नेहमी पुढाकार घेऊन आपले काम बजावत असत, त्यामुळे एक सैनिकांची वृत्ती लहानपनापासून त्यांच्यात होती.

हे ही वाचा:

२५ जानेवारीला सलमान खान चाहत्यांना देणार डबल गिफ्ट, मोठ्या पडद्यावर रिलीज होणार ‘किसी का भाई किसी की जान’ चा टीझर

मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजीनामा देणार?, नरेंद्र मोदींना केली विनंती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version