spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यपाल भवन हे भाजप भवन झालेलं, राज्यपालांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पुण्यात एक कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी राज्याच्या या राजकीय घडामोडीवर त्यांनी हे वक्तव्य केले.

वादग्रस्त विधानांमुळे सतत महाराष्ट्रातील पक्षांच्या निशाण्यावर असणारे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्यापासून राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमतट आहेत. अशातच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सतत वादग्रस्त विधान करत असल्यामुळे त्यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी मी सतत करत आलोय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना त्यांच्या इच्छेनुसार पदमुक्त न करता, राष्ट्रपतींनी त्यांची या पदावरून हकालपट्टी करणे गरजेचे आहे, अशी तिखट प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पुण्यात एक कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी राज्याच्या या राजकीय घडामोडीवर त्यांनी हे वक्तव्य केले. राज्यपालांनी त्यांना पदमुक्त व्हायचे आहे, ही इच्छा मुंबई दौऱ्याकरीता आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, हल्ली राज्यपाल भवन हे भाजप भवन झाले होते आणि मी आणि आमचा पक्ष ही भूमिका सतत मांडत आलोय. राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रातून देखील हेच स्पष्ट होत आहे. महविकास आघाडीच्या काळात संवैधानिक व्यवस्थेला छेद देण्याचे काम राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केले होते. या संपूर्ण काळात भाजपला कसा जास्तीत-जास्त फायदा करून देता येईल, या दृष्टीने त्यांनी काम केले आहे. तसेच त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्या मनात किती पाप आहे हे सर्वानाच कळलं आहे.

पुढे ते म्हणाले, राज्यविरोधी विचार असणारे राज्यपाल आमच्या राज्यात नकोत, हे म्हणणं मांडत मी अनेकदा पत्र लिहिलंय. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. राज्यपालांवर भाजपचा मोठा आशीर्वाद होता. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान करणं त्या सर्वानाच आवडत होतं. म्हणून त्यांनी जाण्याऐवजी त्यांना हटवलं पाहिजे, त्यांचा राजीनामा न घेता त्यांची हकालपट्टी केली पाहिजे. अशा विचारांच्या व्यक्तीची महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून गरज नाही, अशी जोरदार टीका नाना पटोले यांनी केली आहे.

हे ही वाचा:

ब्रिजभूषण प्रकरणी ५ सदस्यीय समिती स्थापन करण्याचे क्रीडा मंत्रालयाने दिले आदेश, मेरी कॉम असणार अध्यक्ष

Governor Bhagat Singh Koshyari, राज्यपालांचा राजीनामा कोण मंजूर करतं?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss